नाशिक : राज्य प्राण्याला सुरक्षित अधिवास

नाशिक : राज्य प्राण्याला सुरक्षित अधिवास
Published on
Updated on

नाशिक : नितीन रणशूर
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचा राज्य प्राणी अर्थात शेकरूला कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सुरक्षित अधिवास लाभत आहे. वन्यजीव विभागासह स्थानिक आदिवासींना देवराई असलेल्या जंगल परिसरातील मानवी हस्तक्षेप रोखण्यात यश आल्याने शेकरूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे यंदाच्या प्रगणनेतून समोर आले आहे. या प्रगणनेत 50 पेक्षा जास्त शेकरूंची प्रत्यक्ष नोंद करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेकरू आपली घरटी तयार करतात. दुर्मीळ तसेच शेड्युल एकमध्ये असलेल्या शेकरूची वन्यजीव विभागाकडून मे महिन्याच्या शेवटच्या, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रगणना केली जाते. यंदाही वनकर्मचार्‍यांच्या मदतीने कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील राजूर आणि भंडारदरा वनपरिक्षेत्रामध्ये शेकरू गणना पार पडली. प्रत्यक्ष जंगलात फिरून वनकर्मचार्‍यांनी प्रगणनेचे काम पूर्ण केले. त्यात अभयारण्यामध्ये शेकरूचा अधिवास वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आंबा, चांदा, करंबू, आळीव, करप, जांभूळ, चांदडा, हिरडा, लांद, कोभोळ, आवळा, येडळा, गेळ, उंबर, शंदरी, गुळचाई, कोकेरी आदी वृक्षांच्या प्रजाती आढळणार्‍या राजूर व भंडारदरा परिक्षेत्रात शेकरूंची घरटी आढळून आली. वनकर्मचार्‍यांनी जीपीएस यंत्राच्या मदतीने शेकरूंच्या घरट्यांच्या नेमक्या जागांचीही नोंद घेतली. राजूर वनपरिक्षेत्रात नवी 177, जुनी 135 घरटी, तर 42 घरटी शेकरूंनी सोडून दिल्याचे आढळले. भंडारदरा वनपरिक्षेत्रात नव्याने 65 घरटी शेकरूंनी बांधल्याचे प्रगणनेत आढळून आले, तर जुनी 46 घरटी आढळून आली. वनकर्मचार्‍यांना प्रगणनेत प्रत्यक्ष शेकरूंचे दर्शन झाले. विशेषत: राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे, तळे, पाचनई, कुमशेत या गावांतील जंगलामध्ये शेकरूंची संख्या अधिक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news