नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि.2) जन्मेठप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुणाल किशोर हरकरे (28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
इगतपुरीतील कोकणी मोहल्ला येथे

23 सप्टेंबर 2018 रोजी दीपक खंडू बोरसे, प्रशांत ऊर्फ लखन खंडू बोरसे हे गणपती विसर्जनाची तयारी करत होते. त्याचवेळी कुणाल हरकरे याने खुन्नसने बघत असल्याच्या रागातून बोरसे बंधूंसोबत वाद घातला. स्थानिकांनी हा वाद मिटविल्यानंतर गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री बोरसे बंधू व सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबलीशेठ हे गल्लीत गप्पा मारत असताना संशयित हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकून पेटता बोळा त्याच्या अंगावर फेकला. दीपक व बबलीशेठ यांच्याही अंगावर पेट्रोल उडाल्याने तसेच लखनची आग विझविताना दोघेही भाजले.

गंभीर जखमी झालेल्या प्रशांत बोरसे याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी तपासाची चक्रे फिरवित हरकरेविरोधात सबळ पुरावे जमा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून हरकरेला जन्मठेप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. योगेश कापसे यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news