

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिस लग्नाची मागणी करीत पीडितेच्या आई वडिलांना एकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात सरफराज इम्तीयाज शेख (२०, रा. काजीपुरा) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, संशयित सरफराज याने बुधवारी (दि.६) काजीपुरा, जुने नागजी चौक या भागांत कारमधून पाठलाग केला. पीडितेचा रस्ता अडवून तिच्या आईवडिलांना शिवीगाळ करीत पीडितेने माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही संशयिताने दिली. तर पीडितेच्या आई वडिलांवर धावून जात धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.