जळगाव : शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक, रावेर तालुक्यात खळबळ

scam
scam

जळगाव: रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार प्रकरणात पोलीसांनी अजून सहा जणांना तालुक्यातील विविध गावांमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संशयित आरोपीची संख्या १८ वर पोहचली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पंचायत समितीच्या अंतर्गत वैयक्तिक शौचालयात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीला आले आहे. यामध्ये यापूर्वी १२ जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २६ जुलै रोजी रात्री उशीरापर्यंत रावेर पोलीसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केले. यात नव्याने सहा संशयित आरोपींची भर पडली आहे.

यात रावेर तालुक्यातील प्रदीप वेडु धनगर (बलवाडी), राहुल जिवन सोनार (निंभोरा), अशोक हरी पाटील (सिंदखेड), गोपाळ वेडु गुरव (बलवाडी), जितेंद्र मंगळु अडगावकर (गाते), राहुल मूरलीधर कोळी (पूरी) यांना अटक करण्यात आली. रावेर पंचायत समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणात आतापर्यंत एकुण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अजूनही काही जण पोलीसांच्या रडावर असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news