नंदुरबार : शेतात वीज कनेक्शनसाठी लाच मागणाऱ्या वायरमनला रंगेहाथ पकडले

नंदुरबार : शेतात वीज कनेक्शनसाठी लाच मागणाऱ्या वायरमनला रंगेहाथ पकडले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

शेतातील वीज कनेक्शन देण्यापोटी लाच मागणाऱ्या टेक्निशियनसह वायरमनला रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली.

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे (खासगी वायरमन) देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे (४८, रा. रजाळे ता. जि. नंदुरबार) आणि अनिल मांगडू भोये (३६, टेक्निशियन महावितरण कंपनी नंदुरबार, रा. प्लॉट नं. १, सिद्धेश्वर नगर, कोकणीहिल, दुधाळे शिवार) अशी आहेत. तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश आनंदराव चौधरी, पोलिस निरीक्षक, समाधान महादू वाघ, पोलिस निरीक्षक माधवी एस. वाघ, विलास पाटील, विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावित, ज्योती पाटील, मनोज अहिरे, जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news