

जळगाव, पुढारी वृत्तसेवा
यावल नगरपालिकेची अखेरची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडली. यावेळी ४८ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४६ विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावल नगरपालिकेची अखेरची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू विश्वनाथ चौधरी (हेन्द्री ) यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात आज पार पडली. सभेच्या पटलावर ४८ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन विषय नामंजूर करण्यात आले. तर ४६ विषयांना मंजूर देण्यात आली आहेत.
नगरपालिकेचा पाच वर्षाचा कालावधी येत्या दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्याअनुषंगाने आज अखेरची सभा घेण्यात आली. यावेळी नगरसेवक अतुल पाटील, प्रा, मुकेश येवले, शे. असलम शे. नबी, यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर सभेत नगरसेवक राकेश कोलते , समिर शेख मोमीन , पौर्णीमा फालक , देवयानी महाजन, नगरसेवक मनोहर सोनवणे, कल्पना वाणी , रेखा चौधरी आदी उपस्थित होते.
हेही वाचा
व्हिडिओ पहा : कुस्तीची परंपरा जोपासतायत नव्या दमाचे मल्ल | wrestling story
https://youtu.be/jQF4MC2RRno