नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

किशोर दराडे
किशोर दराडे

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे हे औरंगाबाद येथे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक चर्चांना उधान आलं आहे.

भुजबळांच्या मतदारसंघात वास्तव्यास असलेली शिक्षक आमदार किशोर दराडे हे अपक्ष निवडून आले आहेत. तसे ते मातोश्रीच्याही अगदी खास गटातले मानले जातात. येवल्यामध्ये शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांच्या स्वागताला किशोर दराडे उपस्थित नव्हते. मात्र, रविवारी (दि.३१) रोजी सकाळी आमदार किशोर दराडे हे औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आढावा बैठकीत त्यांना भेटले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरील फोटोमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागे आमदार दराडे, अब्दुल सत्तार यांच्याबरोबर उभे असलेले दिसून आले.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जनतेतून निवडून येण्यासाठी आमदार किशोर दराडे किंवा दराडे कुटुंबातील आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हे शिवसेनेकडून इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगाने त्यांना त्यांची महत्त्वकांक्षा गुंडाळून ठेवावी लागली होती. मंत्री दादाजी भुसे व आमदार सुहास कांदे यांच्यानंतर नाशिक जिल्ह्यातून शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या रूपाने शिंदे गटाला बळ मिळणार का? अशी चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news