

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा : लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
लेखा नगर येथून बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी जात असतांना गुलमोहोराचे झाड दुचाकीवर पडल्याने यात दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५ ) रा. एकलहरा कॉलनी) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटना घडल्या नंतर घटनेची माहिती युवा सेनेचे विस्तारक व विल्होळीचे सरपंच अंजिक्य चुंभळे, माजी नगरसेवक प्रविण तिदमे, भाजपा सिडको उपाध्यक्ष राहुल गणोरे यांनी घटनेची माहिती पोलिस व अग्नीशामक दलाला दिली. घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक शेख व सिडको अग्नीशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक सुरळीत केली.
मनपा उद्यान विभागाला धोकादायक झाडे काढण्या संदर्भात पत्र दिलेले असताना मनपा उद्यान विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मयताच्या मृत्यूस उद्यान विभाग कारणीभूत आहे. मनपा उद्यान विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.
प्रवीण तिदमे
पश्चिम विधानसभा प्रमुख, सिडको