नाशिक-त्र्यंबक राेडवर स्वतंत्र पालखी मार्ग, दोन लेन राहणार राखीव

नाशिक-त्र्यंबक राेडवर स्वतंत्र पालखी मार्ग, दोन लेन राहणार राखीव
Published on
Updated on

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योर्तिलिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते नाशिक कुंभनगरीला जोडणारा सहापदरी सिमेंट-काँक्रीटचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. सावर्जनिक बांधकाम विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, महामार्गावरील दोन लेन पालखीसाठी राखीव असतील. आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

गेल्या काही वर्षांत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे महत्त्व अधिक वाढले आहे. देश-विदेशातून दरवर्षी कोट्यवधी भाविक भगवान त्र्यंबकराजा चरणी नतमस्तक होतात. याच त्र्यंबकनगरीत वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. दरवर्षी येथे संजीवन समाधी सोहळ्यासह आषाढी एकादशी पालखी सोहळा भरतो. या दोन्ही सोहळ्यांसाठी लाखो वारकरी त्र्यंबकनगरीत दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकला होणार गर्दी लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिकच्या वेशीपासून ते त्र्यंबकेश्वर शहरादरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे सहापदरी मार्गात रूपांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातपूर गावाजवळील पिंपळगाव बहुला येथून हा महामार्ग उभारण्यात येणार आहे. एकूण १७ किलोमीटरच्या संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यातील दोन्ही बाजूंची एक-एक लेन ही पुणे ते पंढरपूरच्या धर्तीवर पालखी मार्ग म्हणून विकसित करण्यात येईल. आषाढी एकादशीला निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याकरिता या लेनचा वापर केला जाईल. अन्य वर्षभर या दोन्ही लेन या वाहनांकरुता खुल्या करून दिला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद व सुखकर होणार आहे.

कुंभमेळा आराखड्याचा समावेश

२०२६-२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यंदा देश-विदेशामधून ५ कोटी भाविक कुंभमेळ्याला उपस्थिती लावतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने शासनाने कुंभमेळ्याकरिता सर्व विभागांचा मिळून साधारणत: १६ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक-त्र्यंबक सहापदरी महामागार्चा समावेश करण्यात आला आहे.

नव्याने प्रस्ताव तयार करणार

सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गासाठी एकेरी लेन उभारण्यासह संपूर्ण १७ किलोमीटरसाठी सिमेंट- काँक्रिटीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला होता. साधारणत: २४० कोटी रुपये खर्च हा त्यासाठी अपेक्षित होता. परंतु, पालकमंत्री दादा भुसे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सहा लेनचा मार्ग उभारावा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

भू-संपादनाची अडचण दूर

नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा सध्या चार लेनचा महामार्ग असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मार्जिन आहे. त्यामुळे चारपदरी महामार्गाचे सहापदरी मार्गात रूपांतरण करताना भू-संपादनाची अडचण भासणार नाही. तसेच या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महामार्गालगतच्या साेयीसुविधा

-महामार्गाच्या दोन्ही बाजूला पालखी मार्ग

-वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी निवारा शेड

-वारकऱ्यांकरिता सुलभ शाैचालयांची सुविधा

-पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा देणार

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news