

नाशिक : जिल्हा परिषदेची अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नूतन इमारत साकारण्यात येत आहे. या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना शनिवारी (दि.२१) दिल्या.
मंत्री भुजबळ यांनी शनिवारी (दि.२१) अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते. यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, नाशिक म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, मनीष रावल, अमोल नाईक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कंत्राटदार व वास्तुविषारद उपस्थित होते.