Firecracker War Reels | पंचवटीतील रामकुंड परिसरात फटाक्यांच्या रील्ससाठी तरुणांची हुल्लडबाजी; 'फटाके वॉर'चा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

Firecracker War Reels | 'पंचवटी फटाके वॉर'च्या नावाने व्हिडिओ वायरल
Firecracker War Reels
Firecracker War Reels
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
लक्ष्मीपूजेच्या रात्री रामकुंड परिसरात काही तरुणांनी एकमेकांच्या दिशेने फटाके व रॉकेट फेकत हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर 'पंचवटी फटाके वॉर' या नावाने वायरल झाला असून सोशल मीडियावर रील तयार करण्याच्या नादात तरुणांनी परिसरातील नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षेडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओतून दिसून येते.

Firecracker War Reels
Nashik Diwali | नवजात कन्यांच्या कुटुंबांना फराळ भेट, पंचवटी सभापती रोहिणी पिंगळे यांचा उपक्रम

दिवाळीला रात्री काही तरुणांनी पेटलेले फटाके आणि रॉकेट थेट एकमेकांच्या दिशेने फेकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ फटाके फोडण्यापुरता मर्यादित न राहता त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर रीलच्या स्वरूपात प्रसारित करण्यात आले.

रामकुंड परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असताना त्यांच्या जवळच फटाके व रॉकेट फेकण्यात आले. वाहनांवर किंवा इंधनाशी संबंधित भागांवर ठिणग्या पडल्यास आग लागण्याची अथवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

Firecracker War Reels
Nashik News | पंचवटी परिसरातील पत्नीच्या हत्येचा प्रयत्न; पतीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सुदैवाने या प्रकारात कोणतीही हानी झाली नाही. वायरल व्हिडिओची दखल घेऊन संबंधित तरुणांची ओळख पटवावी, घटनेची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रामकुंडवर एकमेकांच्या अंगावर पेटलेले फटाके फेकण्याचा वायरल व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

— गजेन्द्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.