Nashik Murder Case | सिडकोतील विल्होळीत थरार! मोबाईल शूटिंगच्या वादातून गच्चीवरून ढकलून तरुणाची हत्या

Nashik Murder Case | अवघ्या पाच तासांत तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा
मोबाईलमध्ये शूटिंग केल्याच्या जुन्या वादातून बोलावून घेतलेल्या तरुणाच्या हाणामारीत एकावर कोयत्याने वार करून गच्चीवरून ढकलून खुनाची थरारक घटना विल्होळी येथील कोळीवाडा, गायकवाड गल्ली परिसरात घडली. राहुल संजय सरकटे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी या तिघांना तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले.

Murder Case
Kapaleshwar Temple Nashik | श्रावणी सोमवार अन् नागपंचमीचा दुग्धशर्करा योग! नाशिक शहरातील शिवमंदिरांमध्ये 'बम बम भोले'चा जयघोष

शांताराम गाडेकरने दीपक पारधी व ज्योती बोंबले यांचे मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा आरोप आहे. याच कारणावरून दीपक पारधीने अजय गांगुर्डे व वैभव मेंगाळ यांना मारहाण करण्यासाठी दि. १७ ऑगस्ट रोजी विल्होळी येथे बोलावून घेतले होते. रात्री १०.३० च्या सुमारास संशयितांनी रमेश खरे व राहुल सरकटे यांची पिकअप गाडी मच्छी मार्केट परिसरात अडवली.

त्यानंतर ते शांताराम गाडेकर यांच्या घरी गेले. संशयितांकडून मारहाण होण्याच्या भीतीने गाडेकर, खरे व सरकटे घराच्या जिन्याने दुमजली गच्चीवर पळाले. मात्र, संशयितांनी त्यांचा पाठलाग करून गच्ची गाठली. यावेळी गांगुर्डे याने, "तू मध्ये आला, अगोदर तुलाच मारतो", असे म्हणत सरकटेच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

Murder Case
Pune Nashik Highway Traffic: नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गाला अखेर गती; ६०० कोटींच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा

गंभीर जखमी राहुलला मेंगाळने गच्चीवरून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपअधीक्षक विमला एम. व उपविभागीय अधिकारी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शीतल गायकवाड, निलेश मराठे, दत्तात्रय वाजे तसेच पोलीस शिपाई मंगेश पानझाडे, योगेश पाटील, अरुण रेहरे व हरी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news