Yeola Unseasonal Rain | येवल्यात अवकाळीचा दणका! वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागांत नुकसान

Yeola Unseasonal Rain | दिवसभराच्या उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६च्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Unseasonal Rain
Unseasonal Rain
Published on
Updated on

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिवसभराच्या उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६च्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहर व ग्रामीण भागात पिकांसह, घरांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain
MHADA Scam | धास्तावलेल्या अधिकाऱ्यांची दांडी, आचारसंहितेमुळे महासभा तहकूब

गुरुवारी (दि.२१) सायंकाळी ६च्या सुमारास ढग दाटून आल्याने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून शहर व परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर अंधारात होता. या मान्सूनपूर्व वादळाचा फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

Unseasonal Rain
Nashik News | नाशिक परिक्षेत्र आयजीपदी ऐनपुरे

सध्या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, झाडांना लागलेले आंबे काढणीला आले आहेत. यात आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उन्हाच्या तीव्र चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक झालेल्या पावसाने बाजारात आलेल्या नागरिकांची, व्यापाऱ्यांची आणि वाहनधारकांची प्रचंड पळापळ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news