Nashik News | नाशिक परिक्षेत्र आयजीपदी ऐनपुरे

Nashik News | राज्याच्या गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे फेरनियोजन करत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) पदावर संजय ऐनपुरे यांची नियुक्ती केली आहे.
Police
Police Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे फेरनियोजन करत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) पदावर संजय ऐनपुरे यांची नियुक्ती केली आहे. तर नाशिक ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी विमला एम. यांची नियुक्ती केली आहे.

Police
Lasalgaon Onion Market | कांदा बाजार खोळंबला; इंधन टंचाईवर उपाय न केल्यास २५ मेपासून लिलावात सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर अलीकडेच प्रवीण पडवळ यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, अल्पावधीतच त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, दादर (मुंबई) येथे बदली करण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय ऐनपुरे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची धुरा सोपविण्यात आली आहे. विमला एम यांची नाशिक ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Police
MHADA Scam | धास्तावलेल्या अधिकाऱ्यांची दांडी, आचारसंहितेमुळे महासभा तहकूब

यापूर्वी त्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १९, अहिल्यानगर येथे समादेशक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलाला अनुभवी अधिकाऱ्यांचे नेतृत्व मिळणार आहे. नाशिकमधून नुकतेच बदली होऊन गेलेले पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहर येथील बदली रद्द करून त्यांना ठाणे शहर पोलिस उपआयुक्तपदी व अकबर पठाण यांची पोलिस अकादमी नाशिक येथून मुंबई पोलिस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news