Nashik Political News 2026 | येवल्याच्या रणांगणात पोटनिवडणुकीचे वारे !

Nashik Political News 2026 | शरद पवार गटाच्या बैठकीत उमेदवारीवरून खडाजंगी आयात उमेदवार नकोच :स्थानिक नेत्यांचा नेतृत्वाला इशारा
election news
election newsFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक तर्क वितर्क केले जात असतानाच, आता जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) आढावा बैठकीत या विषयावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

election news
TCS Harassment Case | नाशिक टीसीएस लैंगिक शोषण प्रकरण: आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; निदा खान अजूनही फरार

मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याच्या शक्यतेने रिक्त होणाऱ्या जागेसाठी आयात उमेदवार नको, भुजबळांविरोधात लढणाऱ्याला उमेदवारी देण्याची मागणी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी यावेळी केली. शहरात सोमवारी (दि. ४) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची आढावा बैठक झाली.

या बैठकीत पक्ष संघटनेवर चर्चा सुरू असतानाच, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी पोटनिवडणुकीचा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले. मंत्री भुजबळ राज्यसभेवर जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी रिक्त होऊन पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

येवल्यातील एका राजकीय कुटुंबातील सदस्य (ज्यांचे संबंध सर्वच पक्षांशी आहेत) उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पक्षनेतृत्वाने येथे कोणताही आयात उमेदवार देऊ नये. आम्ही निष्ठावान कार्यकर्ते भुजबळांविरोधात लढत आहोत, असे ठाम प्रतिपादन शिंदे यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सावध भूमिका घेत, या गोंधळावर पडदा टाकताना सांगितले की, पक्षाकडे अद्याप कुणीही उमेदवारीसाठी संपर्क केलेला नाही. पोटनिवडणुकीची चर्चा ही केवळ स्थानिक स्तरावर असावी, पक्ष पातळीवर असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रदेशाध्यक्षांनी हा विषय फेटाळून लावला असला, तरी कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता या बैठकीतून स्पष्टपणे समोर आली आहे.

election news
EV Sales Report 2026 | अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम; इंधनाच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा मोर्चा ईव्हीकडे, विक्रीत 19 टक्क्यांची वाढ

शिंदेंचा गौप्यस्फोट

बैठकीत केवळ भविष्यातील पोटनिवडणुकीचीच चर्चा रंगली नाही, तर माणिकराव शिंदे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील एका गुप्त प्रकरणाचा स्फोट केला. 'मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना, आपल्याच पक्षातील बडा नेता माझ्या घरी आला होता.

'भुजबळ हे मोठे ओबीसी नेते आहेत, ते जर पडले तर काय होईल?' असे सांगत साकडे घातले होते.' असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला. त्यावेळी बैठकीत त्या नेत्यांचे नाव सांगा अशी विचारणा झाली. मात्र, त्याचे नाव जाहीरपणे सांगता येणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news