

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.५) न्यायालयात सुनावणी होणार आहे. संशयित आरोपी अश्विनी चैनानी, तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
यापैकी अश्विनी चैनानी सध्या कोठडीत नसून, उर्वरित चार आरोपी पोलिस कोठडीत आहेत. यामधील प्रमुख संशयित आरोपी निदा खान ही अजूनही फरार आहे तिचा जामीन अर्ज या अगोदरच फेटाळला आहे.
सहायक आयुक्त संदीप मिटके यांचे विशेष तपास पथक तिचा शोध आहे. राज्यभर खळबळ उडविणाऱ्या या प्रकरणाचे तपास यंत्रणांकडून विविध पुरावे गोळा करण्यात येत आहेत. यामध्ये पीडित महिलांचे जबाब, डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी यांचा समावेश आहे. विशेष तपास पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, काही धागेदोरे परदेशी संपर्काशी संबंधित असल्याचाही संशय आहे.