

नाशिक : निल कुलकर्णी
तंबाखू सेवनाने दरवर्षी जगात सहा दशलक्ष लोकांचा मृत्यू ओढावतो तर त्यातील निकोटीन विषाने अनेक जन असाध्य आजाराचे बळी ठरतात. तंबाखु सेवनाने बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत असताना सुगंधी सुपारी आणि तंबाखुविरहित म्हणून विकल्या जाणाऱ्या कैक उत्पादनांच्या धवल पॅकमधून 'काळे' हेतू असणारी तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीचे प्रमाण वाढल्याचे अभ्यासक सांगत आहेत.
१ मे १९८८ रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाची स्थापना करण्यात आली. 'तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग धोरणांच्या युक्तांचा पर्दाफाश करणे' अशी यंदाची संकल्पना आहे. राज्यात गुटख्याला बंदी आहे, मात्र छप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरूच आहे. यासह सिगारेट, विडी, मिस्त्री या प्रकारात तंबाखू सेवन करणाऱ्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. सर्वाधिक घातक म्हणजे काही वर्षांपूर्वी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थाचे आहारी गेल्याचे दिसत होते. आता शाळकरी मुलेही याच्या आहारी गेल्याचे भीषण वास्तव आहे. तंबाखुजन्य पदार्थांचे सेवनाने नाशिकमध्ये प्रतीवर्षी एक हजारांहून अधिक व्यक्तींना कर्करोग आणि अन्य आजार उद्भवतात.
अन्न आणि औषध प्रशासनाकडे येणाऱ्या एखाद्या नव्या उत्पादनात तंबाखुचा अंश नसतो. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक बॅचेसमध्ये छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थ मिसळले जातात. युवा वर्गाला म्हणूनच त्याचे 'व्यसन' लागते, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. शुभ्र उत्पादनातील तंबाखूचे छुपे काळे धंदे बंद होण्याची गरजही व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली, निकषात तपासणीचे वेळी अनेक उत्पादने तंबाखु, निकोटीन मुक्त आहे असे दाखवले जाते. मात्र, तपासणीनंतर तयार होणाऱ्या पुढील बॅचेसमध्ये निकोटीनचा 'अंश' मिसळला जातो. त्यामुळे युवा वर्गाला त्या उत्पादनांचा विळखा पडतो, असे अभ्यासक सांगतात. देशात,पानमसाला, सुंगधी सुपारी, सिंथेटिक मुखवास,आणि अन्य सुपारी उत्पादनांचे युवा वर्गाला व्यसन जडले आहे, त्यात हमखास निकोटीन अथवा तंबाखुजन्य पदार्थाचे अंश असतातच. असा अभ्यास तज्ज्ञांनी नोंदवला. त्यामुळे शुभ्र उत्पादनामधे युकतीने तंबाखूजन्य पदार्थांचे मिश्रणाच्यायुक्त्यांचा हेतूंचा मुखवटा फाडण्याची गरज यंदाचे उद्दीष्ट आहे.
अन्न व औषध प्रशासानाकडून एखाद्या पदार्थाचे उत्पादन करण्याची परवाणगी घेताना त्यांचे त्यांचे निकष नियमानुसार उत्पादन तंबाखुमक्त असल्याचे दाखवतात. त्यानंतर तयार होणाऱ्या मालाच्या बॅचेसमध्ये अशा पदार्थचे अंश मिश्रित केले जातात. ज्या सुंगधी सुपारी, पानमसालाचे युवावर्गाला 'अॅडिशक्शन' होते त्यात हमखास तंबाखु किंवा तंबाखूजन्य पदार्थ असतात. त्यामुळे 'एफडीए' अशा उत्पादनांच्या 'बॅचेस'ची नियमित व वरचेवर तपासणी करावी.
डॉ. सुधीर संकलेचा, माजी अध्यक्ष, आयएमए, नाशिक.
तंबाखूचा वापर आणि त्याचे सेवनाने तोंडाचा आणि फुस्फुसाचा कर्करोग सबम्युकस फायब्रोसिस (ताेंड न उघडणे).यासह स्वरयंत्र, तोंड, अन्ननलिका, घसा, मूत्राशय, मूत्रपिंड, यकृत, पोट, स्वादुपिंड, कोलन आणि गर्भाशय ग्रीवा, तसेच तीव्र मायलोइड ल्युकेमिया यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हेच आहे.