

नाशिक : निल कुलकर्णी
नॅशलन असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) नाशिक संस्थेतील दृष्टीबाधिक, अंध मुली गेल्या २५ वर्षांपासून अंधत्वावर मात करुन रोप मलखांब प्रकारात धवल प्रगती करत आहेत. अनेक मुली राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेत यशावर नाव कोरुन क्रीडा क्षेत्रातून 'दिव्यदृष्टी'चा शोध घेत आहेत.
१५ ऑक्टोबर जागतिक अंध दिन म्हणून साजरा होताे. हा 'पांढरी काठी' दिन म्हणूनही ओळखला जातो. यात दृष्टीबाधित व्यक्तींना सन्मान, समर्थन आणि स्वातंत्र्य देण्यासाठी संकल्प करण्याच्या उद्दिष्ठांवर भर देऊन त्यांना सक्षम करुन मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश आहे. 'सर्वसमावेशकता आणि सुलभता' ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. दृष्टीबाधित आणि कमी दृष्टी असलेल्या लोकांसाठी माहिती, शिक्षण, रोजगार आणि इतर कामांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
आयटीआय सिग्नल येथील 'नॅब' नाशिक या संस्थेतील नेत्रहिन मुली गेल्या २५ वर्षांपासून रोप मल्लखांब क्षेत्रात यश मिळवत आहेत. यशवंत व्यायाम शाळेतील मलखांब प्रशिक्षक यशवंत जाधव मुलींना संस्थेत जाऊन गेली प्रशिक्षण देत आहेत. येथील मुलीं केवळ आवाजाव्दारे तंत्रशुद्ध आणि आसानाची ओळख करुन दोरीवर सामान्य मुलींप्रमाणे जलद मलखांबाचे शिक्षण करतात. नेत्रहिन मलखांबपटूंचे एकाग्रता सामान्य मुलांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांचे प्रशिक्षक सांगतात.ण त्यांच्या सर्व क्रिया, ॲक्टीव्हिटी या केवळ स्पर्श आणि आवाजावरुन होत असल्याने त्यांचा हा 'सेंन्स' अधिक विकसित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नॅब संस्थेतील मुली सध्या दोरीवरला (रोप) मलखांबमध्ये प्राविण्य मिळवत असून दात्यांकडून पोल मलखांब देणगीतून मिळाला तर पुरलेल्या मलखांबचेही प्रशिक्षण घेण्यास त्या सज्ज आहेत. २००० पासून नॅब नाशिकच्या पहिली ते दहविच्या मुलींना प्रशिक्षक जाधव हे सात्यत्याने प्रशिक्षण देत आहेत. आव्हानावर मात करुन या मुलींनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 'प्रकाश'मान यश मिळवत आहेत.
गेल्या २५ वर्षांपासून 'नॅब'च्या विद्यार्थींना मलखांब प्रशिक्षण देत आहे. त्यांची कामगिरी उत्तम असून त्या राज्यस्तरावरील स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. महिला मलखांबपटू विवाहानंतर किंवा राज्यशासनाचे पुरस्कार मिळाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून बाजूला पडतात. त्यांनी प्रशिक्षण म्हणून कार्यरत राहत क्रीडा संस्कृतीला बल द्यावे असे वाटते.
यशवंत जाधव, मलखांब प्रशिक्षक. 'नॅब', नाशिक.
गेल्या २५ वर्षांपासून 'नॅब'च्या विद्यार्थींना मलखांब प्रशिक्षण देत आहे. त्यांची कामगिरी उत्तम असून त्या राज्यस्तरावरील स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. महिला मलखांबपटू विवाहानंतर किंवा राज्यशासनाचे पुरस्कार मिळाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून बाजूला पडतात. त्यांनी प्रशिक्षण म्हणून कार्यरत राहत क्रीडा संस्कृतीला बल द्यावे असे वाटते.