जागतिक मेंदू दिन विशेष: पावसाळ्यात ’ब्रेन फॉग’चा त्रास?

नोकरदारांच्या मानसिक कार्यक्षमतेवर परिणाम
जागतिक मेंदू दिन विशेष:
पावसाळ्यात ’ब्रेन फॉग’चा त्रास? Pudhari
Published on
Updated on

पुणे: पावसाळा उकाड्यापासून दिलासा देणारा असला, तरी बदलत्या जीवनशैलीमुळे आणि असमतोल आहारामुळे नोकरदारांना या काळात ‘ब्रेन फॉग’चा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेषत: आयटीमधील कर्मचार्‍यांना या हंगामात मानसिक थकवा, विसराळूपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा जाणवतो. ‘ब्रेन फॉग’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या स्थितीमुळे निर्णयक्षमता आणि कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. (Latest Pune News)

उच्च आर्द्रता, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि हवेचा बदलता दाब हे मेंदूच्या कार्यप्रणालीवर प्रतिकूल परिणाम करणारे घटक आहेत. याशिवाय पावसाळ्यात अधिक प्रमाणात होणारे सायनससारखे संसर्ग, बुरशीचा प्रादुर्भाव आणि त्यासोबत येणाऱ्या अ‍ॅलर्जी हेही मेंदूवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत, असे वैद्यकीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

ढगाळ हवामानामुळे झोपेच्या वेळापत्रकात गडबड होते. परिणामी, शरीराचे नैसर्गकि घड्याळ बदलते आणि ब्रेन फॉग’चा त्रास जाणवतो.

विशेषतः माहिती तंत्रज्ञान, विश्लेषण, व्यवस्थापन आणि निर्णयक्षमता महत्त्वाची असलेल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. विशेषज्ञांच्या मते, संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे, घरात आणि कार्यालयात हवा खेळती ठेवणे आणि नैसर्गकि प्रकाश घेणे हे उपाय ‘ब्रेन फॉग’पासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

जेव्हा आपण म्हणतो की डोकं नीट चालत नाहीये किंवा विचार स्पष्ट होत नाहीयेत, यालाच वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. वैद्यकीय द़ृष्टिकोनातून पाहिल्यास, जेव्हा एखादी व्यक्ती गोंधळून जाते, तिच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो, निर्णय घेणे कठीण जाते, ही अवस्था म्हणजेच ‘ब्रेन फॉग’. वातावरणीय बदलांमुळे काही वेळेस विचार करण्याच्या पद्धतीमध्ये अडथळा येतो, निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि एक मानसिक गोंधळाची स्थिती निर्माण होते. या अवस्थेसाठी काही साधे उपायही आहेत. उदाहरणार्थ तणाव कमी करणे, पुरेशी झोप घेणे आणि पर्यावरणाशी सुसंगत राहणे.

- डॉ. संतोष सोनटक्के, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक

मान्सूनचा हंगाम हा उकाड्यापासून दिलासा देणारा असला, तरी नोकरदारांना या काळात ‘ब्रेन फॉग’ म्हणजेच मानसिक अस्पष्टतेचा त्रास जाणवतो. यामागे उच्च आर्द्रता, सूर्यप्रकाशात घट आणि बदलते वायुदाब हे प्रमुख कारणीभूत घटक आहेत, जे मेंदूच्या नैसर्गकि कार्यप्रणालीवर परिणाम करतात. सततचा थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, कमी स्मरणशक्ती ही यामधील सामान्य लक्षणे आहेत. यावर उपाय म्हणजे संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे, घरातील योग्य वायुवीजन ठेवणे आणि शक्य तितका नैसर्गकि प्रकाश मिळविणे. पावसाळ्यात मेंदूच्या कार्यक्षमतेवर सूक्ष्म परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेणे आणि त्यावर वेळेत उपाय करणे, हेच या त्रासावर मात करण्याचे पहिले पाऊल आहे.

- डॉ. अनिता विक्रम, न्यूरोलॉजिस्ट, इनामदार हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news