Doctors Day 2026: वैद्यकीय क्षेत्रात आता 'महिलाराज'! डॉक्टर बनण्यात मुली आघाडीवर; प्रत्येक दोन विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थिनी

Medical Education Female Students | 'एमबीबीएस'मध्ये प्रत्येक दोन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी; स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजी शाखेत महिलाराज
Medical Education
Medical Education
Published on
Updated on

Doctors Day 2026 what percentage of medical students are female

नाशिक : सतीश डोंगरे

एकेकाळी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात आता 'महिलाराज' बघावयास मिळत आहे. वैद्यकीय शिक्षणापासून ते रुग्णसेवेपर्यंत महिला डॉक्टर आपला ठसा उमटवित असून, ग्रामीण भागातील रुग्णालय असो वा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी 'व्हाइट कोट' मध्ये महिला डॉक्टर आपली छाप पाडत आहेत.

Medical Education
Maharashtra Helmet Usage: राज्यात केवळ 19 टक्के दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा योग्य वापर

मागील काही वर्षांपासून वैद्यकीय शिक्षणात मुर्तीचे प्रमाण सुमारे ४७ टक्के इतके असून, प्रत्येक दोन विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थिनी असल्याने वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने महिला डॉक्टरची संख्या वाढत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील एमबीबीएसच्या ८ हजार ५३५ प्रवेशांपैकी ४ हजार ४० प्रवेश मुलींनी मिळविले आहेत.

म्हणजेच एकूण प्रवेशांपैकी सुमारे ४७ टक्के विद्यार्थिनी आहेत. २०१५-१६ मध्ये ही संख्या अवधी एक हजार ७३७ इतकी होती. मागील १० महिन्यांत यात दुपटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८० इतकी आहे. त्यात एमबीबीएसच्या जागा ११ हजार ८४४ इतक्या असून, त्यात मुर्लीच्या प्रवेशांचा टक्का सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे सध्या स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, बालरोग, भूलशास्त्र रेडिओलॉजी, त्वचारोग, पॅथॉलॉजी, फॅमिली मेडिसिन आणि मानसिक आरोग्य अशा शाखांमध्ये महिला डॉक्टरांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रुग्णांशी संवाद, संवेदनशीलता आणि सेवा यामुळे अनेक रुग्ण महिला डॉक्टरांवर अधिक विश्वास व्यक्त करत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

महिला डॉक्टरांनी केवळ उपचारापुरतेच योगदान मर्यादित ठेवलेले नाही. वैद्यकीय संशोधन, रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य धोरणांच्या अंमलबजावणीतही त्यांचे नेतृत्व वाढत आहे. कोविड काळातही हजारो महिला डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता आघाडीवर काम करून समाजाला दिलासा दिला.

Medical Education
Goa Women Survey | डिजिटल गोव्यात महिलांची बाजी! राज्यातील तब्बल 94 टक्के महिला करताहेत इंटरनेटचा वापर

राज्यात ३४३ नागरिकांमागे एक डॉक्टर

राज्यातील ३४३ नागरिकांमागे एक डॉक्टर आहे. राज्यातील नोंदणीकृत अॅलोपॅथी डॉक्टरांची संख्या २ लाख १३ हजार ५५१ इतकी आहे. आयुर्वेद डॉक्टर १ लाख ५ हजार ९६६ इतके आहेत. होमिओपॅथी डॉक्टर २० हजार सहा इतके आहेत. तर युनानी डॉक्टरांची संख्या ९ हजार ४६२ इतकी असून, एकूण नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या ४ लाख १८ हजार ९८५ इतकी आहे.

यात महिला डॉक्टरांचे प्रमाण सुमारे ४७ टक्क्यांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरा वेगाने बदलत असून, पुरुषप्रधान मानले जाणारे वैद्यकीय क्षेत्र आता महिलांच्या नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे.

वैद्यकीय क्षेत्र सन्मानाचे क्षेत्र असून, यात महिला डॉक्टरांचा वाढणारा टक्का निश्चितच अभिमान वाढविणारा आहे. हे क्षेत्र पुरुषप्रधान होते, मात्र, आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या क्षेत्रात सेवा देत असल्याने, ही बाब अभिमानास्पद आहे.

डॉ. विशाल पवार, अध्यक्ष, आयएमए

मुली ध्येयवेड्या असतात. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासाला वाव असल्याने, मुली या क्षेत्रात मोठ्या संख्येने येत आहेत. महिला डॉक्टरांकडून केवळ उपचाराला प्राधान्य दिले जात नाही, तर मायेचा स्पर्श आजार बरा होण्यास मदतशीर ठरतो.

डॉ. निकिता पाटील-राजणे, उपाध्यक्षा, आयएमए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news