Women Entrepreneurs Roll in Economy : महिला उद्योजकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बुस्ट

उद्योजक महिलांसाठी गुंतवणूकीला आणखी वेग देणे गरजेचे
Women Entrepreneurs Roll in Economy
Women Entrepreneurs Roll in Economy : महिला उद्योजकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बुस्ट Pudhari News Network
Published on
Updated on

Commonwealth and Development Office report : If both men and women were to continue to work as entrepreneurs at the same level, an estimated $2.5 to $5 trillion could be added to the Global Economy.

नाशिक: जागतिक स्तरावर व्यवस्थापनात महिलांना केवळ २८ टक्केच प्रतिनिधित्व लाभलेले आहे. तथापी उद्योजक महिलांसमोरील अडथळे हटविल्यास तसेच महिला-पुरुष हे दोघे उद्योजक म्हणून समान पातळीवर कार्यरत राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत अंदाजे 2.5 ते 5 ट्रिलियन डॉलर्सची भर पडू शकते, असा अंदाज कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट कार्यालयाच्या नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.

भारतात पुरुषांना उद्योजक मानले जाते आणि त्यांना आधार देण्याच्या दृष्टीकोनातूनच अर्थव्यवस्थेची रचना केली गेलेली आहे. महिलांमधील उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन दिल्यास महिला सक्षमीकरणाच्या बळकटीकरणाला विविध अभ्यासात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट कार्यालयाच्या आर्थिक विकास आणि भागीदारी विभागाचे संचालक हेलेन किंग यांच्या मते महिला उद्योजकांसमोरील अडथळे हटविल्यास त्या जागतिक अर्थव्यवस्थेला जोरदार गती देऊ शकतात. परंतु जगात जगात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संख्येत, वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर आणि सर्व संचालक मंडळामध्ये महिलांना मर्यादीत प्रतिनिधित्व आहे.

Women Entrepreneurs Roll in Economy
Water Issue : उद्योजक पाण्यासाठी टँकरवर अवलंबून

भारतात, महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी नीती आयोगाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेला महिला उद्योजकता मंच महिला उद्योजकांसाठी व्यासपीठ म्हणून काम करते. या व्यासपीठाद्वारे मोफत क्रेडिट रेटिंग, मार्गदर्शन, निधीचा पुरवठा, प्रशिक्षणार्थी आणि कॉर्पोरेट भागीदारी यासारख्या सेवा प्रदान केल्या जातात. राज्य स्तरीय पातळीवर प्रोत्साहन केंद्र (इनक्युबेशन सेंटर) तसेच प्रवेग केंद्र महिलांना अधिकाधिक निधी वाटपावर भर देत आहेत.

महिलांच्या व्यवसायातील गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या उद्योगांसमोर गुंतवणूकीतील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये अधिकाधिक महिला कर्ज अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यास अधिक महिलांपर्यंत पोहोचता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Women Entrepreneurs Roll in Economy
मोदी सरकारच्‍या योजनांना मोठे यश, चीनमधील उद्योग भारतात येण्‍यास सुरुवात : अमेरिकेतील उद्योजक मार्क मोबियस

महिला उद्योगातील गुंतवणूकीचे फायदे

  • निओग्रोथच्या निओइनसाइट्सच्या 'भारतातील महिला व्यावसायिक मालकांची उद्योजकीय भावना' या अभ्यासात ६७ टक्के महिलांनी इतर महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी सक्षम केले आहे, तर ५० टक्के महिलांनी कर्मचाऱ्यांना स्वतःचे उद्योग सुरू करण्यास प्रेरित केले आहे आणि तरुण मुलींना शिक्षणासाठी ४७ टक्के महिला प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

  • व्हेरिस वेल्थ पार्टनर्सच्या अहवालानुसार, महिला ग्राहकांचा कर्ज परतफेडीचा दर खूप अधिक आहे. तसेच त्यांच्यासाठी कर्जमाफी आणि कर्ज-नुकसान तरतुदीच्या आवश्यकता खूपच कमी असते.

Nashik Latest News

लैंगिक असमानतेमुळे जगभरातील महिला आणि मुलींची जीवनशैली, उपजीविका, आरोग्य आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला आहे. महिला सक्षमीकरण आणि उद्योजकतेवर सतत लक्ष केंद्रित केल्यास परिस्थिती बदलून सर्व अर्थांनी हे जग समान दिसेल, अशी आशा आहे.

डॉ. पूनम टंडन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स

महिला उद्योजकांसमोरील अडथळे

  • महिलासाठी अनेक योजना असल्या तरी अल्प जागरूकता, निष्क्रिय मानसिकतेमुळे या योजनांची माहिती घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. भारतात, लिंग, जात आणि वर्गाशी संबंधित शक्तिशाली सामाजिक नियम या बाबी महिलांना व्यवसायात सहभागी होण्यास अडथळा ठरतात.

  • महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांच्या वाढीसाठी सुलभ वित्तपुरवठा हा महत्त्वाचा घटक आहे. वित्तपुरवठा उपलब्धतेचा अभाव हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याचे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) च्या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news