Water Crisis | बिटको रुग्णालयात पाणीबाणी; 200 रुग्णांचे प्रचंड हाल

Water Crisis | रुग्णालयात सध्या दररोज एक टैंकर मागविला जात असून, त्यातूनच रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांची तहान भागविली जात आहे.
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडसह पंचक्रोशीतील ३० ते ३५ खेड्यांमधील रुग्णांसाठी उपचाराचा केंद्रबिंदू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्थात बिटको रुग्णालयात मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठाच केला जात नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांचे मोठे हाल होत आहेत. रुग्णालयात सध्या दररोज एक टैंकर मागविला जात असून, त्यातूनच रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांची तहान भागविली जात आहे.

Water Crisis
Nashik Unseasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळी तांडव; पूल तुंबले, रस्त्यांत चिखल

रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या बेभान खोदकामाचा रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना फटका बसल्याने पाणीपुरवठा खंडित झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रुग्णालयात सद्यस्थितीत २०० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून पाणीच येत नसल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांसह डॉक्टर, परिचारिकांचेदेखील मोठे हाल होत आहेत. मागील सहा दिवसांपासून दररोज एक टैंकर मागविला जात असून, त्यातूनच रुग्णांची तहान भागविण्यासह अन्य बाबींसाठी पाण्याचा वापर केला जात आहे..

बांधकाम विभाग बेजबाबदार

तब्बल अडीच लाख स्क्वेअर फूट बांधकाम असलेले बिटको रुग्णालय सुविधांपेक्षा असुविधांमुळेच जास्त चर्चेत असते. ३५ रुग्णांच्या वाँडाँत केवळ दोनच बाथरूम असल्याने, तेथे महिला रुग्णांची मोठी हेळसांड होत असते.

ही बाब महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निर्दशनास आणून दिली असून, सिंहस्थ कामांमध्ये रुग्णालयात गरजेनुसार सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात आहे.

Water Crisis
Nashik Kumbh Mela | सिंहस्थात 27 हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज

बोअरवेलचे काम सुरू

महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असल्याने, रुग्णालयात बोअरवेल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. बोअरवेल झाल्यास पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकेल.

भुरट्या चोरांचा त्रास

रुग्णालयात भुरट्या चोरांचा त्रास कायम आहे. बाथरूममधील नळ चोरून नेणे, पाइप लंपास करणे याचादेखील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. रुग्णालयात सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे कर्मचारी सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news