Vima Yojna : महिलांमध्ये जीवन विम्याचे प्रमाण झेपावले 35 टक्क्यांवर

आयआरडीएआयचा अहवाल: नवदुर्गांमध्ये आर्थिक नियोजनासाठी जागरूकता वाढविणे गरजेचे
जीवन विमा योजना
जीवन विमा योजनाPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: जीवन विमा योजना संरक्षण आणि बचत असे दुहेरी फायदे देणारे एक उत्तम आर्थिक साधन आहे. आयआरडीएआयच्या ताज्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये महिलांनी स्वतःसाठी घेतलेल्या विमा पॉलिसींची संख्या सुमारे ९७.३८ लाख होती. त्यावेळी घेण्यात आलेल्या एकूण २.८४ कोटी पॉलिसींपैकी महिलांच्या पॉलिसीचे प्रमाण ३४.२० टक्के इतके होते. प्रत्येक महिलेसाठी जीवन विमा योजनेचे संरक्षणरुपी कवच असणे आवश्यक असल्याने विमा योजनांबद्दल महिलांमध्ये जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.

एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पेलणे, ही महिलांना निसर्गतः मिळालेली देणगी आहे. गृहिणीची भूमिका असो किंवा करिअरची असो अथवा दोन्ही एकाच वेळी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतात. या भूमिकांमध्ये एक भविष्यासाठी नियोजन हा समान धागा आढळतो. आपल्यातील संरक्षणात्मक प्रवृत्ती आपल्याला नेहमीच संकट काळाला तोंड देता येण्यासाठी बचत करण्यास प्रवृत्त करते. पुर्वी महिला रोख रक्कम गोपनीय ठिकाणी साचवून ठेवत आणि फक्त आणीबाणीच्या वेळीच या रकमेचा वापर करत. सध्याच्या बदलत्या काळात बचतीची ही सवय बदलणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे भविष्यासाठी बचत उभी करु शकणाऱ्या आर्थिक योजनांमध्ये सक्रियपणे सहभाग घेणे, महिलांसाठी तितकेच आवश्यक आहे

जीवन विमा योजना
Ladki Bahin Yojna : नाशिक जिल्हा परिषदेतील पुरुष कर्मचारी लाडक्या बहिणींचे लाभार्थी

बचत खात्यातील किंवा आवर्ती ठेव खात्यातील निधी वाढत्या महागाईवर सहसा मात करु शकत नाही. शिवाय, रुग्णालयात उपचारासाठी दीर्घ काळ रहावे लागल्यास दशकभरात जमा केलेला संपूर्ण बचत निधी खर्ची पडू शकतो. म्हणूनच, नोकरदार महिला अथवा गृहिणींनी वेगवेगळ्या आर्थिक बचत योजनांचा विशेषतः जीवन विम्याचा विचार करणे अतिशय गरजेचे असल्याचे आयआरडीएआयच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

जीवन विमा आर्थिक संरक्षणाची पहिली गरज पूर्ण करते. कुटूंबातील कमावत्या व्यक्तीचे काही बरेवाईट झाले तर पॉलिसीतून मिळणारे उत्पन्न कुटूबांच्या उत्पन्नाच्या साधन ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक काम करणारी महिला आणि तिच्या जोडीदारासाठी टर्म लाइफ इन्शुरन्स ही काळाची गरज आहे. तसेच, टर्म इन्शुरन्स हा केवळ विवाहित महिलांसाठीच नाही. तो एकट्या राहणाऱ्या, अविवाहीत महिलांमध्येही लोकप्रिय होत आहे. पॉलिसीबाजारने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात एकट्या महिलांनी विवाहानंतर त्यांना होणाऱ्या अपत्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी टर्म प्लॅनची ​​योजना खरेदी केली पाहिजे, असे नमूद करण्यात आलेले आहे.

जीवन विमा योजना
एलआयसीची ‘विमा सखी योजना’

घराचा आणि कुटुंबासाठी दिवसरात्र विचार करत असताना महिलांनी आर्थिक नियोजनाबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला तर जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याचबरोबर आपली दीर्घकालीन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या अधिक उत्तम प्रकारे सदैव सज्ज राहू शकतो.

विभा पडळकर, एमडी आणि सीईओ, एचडीएफसी लाईफ

दीर्घ कालावधीसाठी नियोजन

घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण ही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. योग्य आर्थिक योजनांच्या सहाय्याने या उद्दिष्टांची पूर्तता सुनिश्चित बचतीतूनच साधता येतात. सध्या जीवन विमा बचत आणि गुंतवणूक योजना, म्युच्युअल फंड, इक्विटी इत्यादी विविध प्रकारच्या आर्थिक योजना बचतीसाठी उपलब्ध आहे. गुंतवणुकीचा कालावधी, सध्या मिळणारे उत्पन्न, दायित्वे आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन आपल्या गरजा पूर्ण करणारी योजना निवडणे, हा कोणत्याही आर्थिक नियोजनातील मुख्य घटक आहे आणि जीवन विमा ही खात्री प्रदान करते.

Nashik Latest News

व्दितीय उत्पन्नाचे साधन

परताव्याची हमी देणाऱ्या जीवन विमा योजना उत्पन्नाचे व्दितीय साधन ठरु शकतात. त्याच्यांतून मिळणारा अतिरिक्त निधी विदेशात सुट्टीचा आनंद घेण्याची आपली आकांक्षा पूर्ण करू शकतो. एवढेच नाही तर, नियोजित अथवा अचानक उदभवलेल्या काही कारणांमुळे नोकरी गेल्यास किंवा कारकिर्दीला ब्रेक लागल्यास या योजना तुम्हाला नियमित उत्पन्न प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news