Marriage Fraud Case | वणीत 'लुटेरी दुल्हन' टोळीचा पर्दाफाश! ३ मुलांच्या आईला 'अविवाहित' दाखवून सोलापूरच्या वराला साडेतीन लाखांना लुटले

Marriage Fraud Case | सोलापूरच्या युवकाची लाखोंची फसवणूक; नऊ जणांविरुद्ध गुन्हा, एका संशयित महिलेस अटक
Marriage Fraud Case |
Marriage Fraud Case | ‘लखोबा लोखंडे’चा डिजिटल अवतार अखेर जाळ्यात; एक-दोन नव्हे, तब्बल २५ महिलांशी प्रेम, लग्‍न अन् कोट्यवधीची लूट
Published on
Updated on

वणी : पुढारी वृत्तसेवा

विवाहित महिला अविवाहित असल्याचे भासवून तिचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील एका युवकाशी लावून देत लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.

Marriage Fraud Case |
Taliban New Family Law | तालिबानचा 'क्रूर' फतवा! अफगाणिस्तानात बालविवाहाला मान्यता, मुलीच्या 'मौनाला' संमती मानणार!

विशाल जयवंत धावणे (वय २४, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हे शेती व्यवसाय करतात. विवाहासाठी वधूचा शोध सुरू असताना त्यांचा संपर्क एका विवाह एजंटाशी आला. एजंटामार्फत एका महिलेची ओळख करून देण्यात आली.

मात्र, संबंधित महिलेचा यापूर्वी विवाह झाला असून ती तीन मुलांची आई असल्याची माहिती लपवून तिला अविवाहित असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, नऊ जणांच्या टोळीने संगनमताने फसवणुकीचा कट रचला. विवाह ठरविताना एजंटाला ५० हजार रुपये व वधूच्या वडिलांना २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.

Marriage Fraud Case |
Corporate Jihad | नाशिकनंतर पुण्याच्या आयटी कंपनीत ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’

७ जून २०२६ रोजी दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील मंदिरात विवाह पार पडला. विवाहानंतर प्रवासादरम्यान संबंधित महिलेला वाहनातून उतरविण्यात आले आणि ती अचानक गायब झाली. यानंतर चौकशी केल्यावर तिचा पूर्वीच विवाह झालेला असून तिला तीन मुले असल्याचे समोर आले.

या प्रकरणी बापू अंधारे, काही अनोळखी एजंट, महिला व पुरुषांसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news