

ठळक मुद्दे
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी
मालेगाव तालुक्यातील व येवला कुटुंबातील नाशिकचे सात भाविक अडकले
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
नाशिक : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) दुपारी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली. या दुर्घटनेमुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून, नाशिक जिल्ह्यातील सात भाविक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अडकलेल्या भाविकांमध्ये नाशिक शहरातील कोटकर कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. त्यामध्ये दीपक कोटकर (५३), शुभांगी कोटकर (४८), शौनक कोटकर (२४) आणि शर्विल कोटकर (२०) यांचा समावेश आहे. तर मालेगाव तालुक्यातील व येवला कुटुंबातील नाशिकचे सात भाविक अडकले आहेत.
तीन सदस्यही या पूरस्थितीत अडकले आहेत. यामध्ये सुरेश येवला (५२), नयना येवला (४४) आणि अनिकेत येवला (२५) यांचा समावेश आहे. हे सर्व भाविक केदारनाथ-बद्रिनाथ यात्रेसाठी गेले होते. पूर व ढगफुटीमुळे संपर्क तुटलेला असला तरी, प्रशासनाकडून सातत्याने संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र सातत्याने संपर्क करण्याच्या प्रयत्न करीत आहे. अतिवृष्टी, ढगफुटी तसेच आवश्यक माहितीसाठी खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र (ईआरएसएस)
0135-2710334
0135-2710335
8218867005
9058441404
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र (एसईओसी) 022-22027990,
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र - 0253-2317151
या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.