Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना; महापालिका आयुक्त असणार अध्यक्ष

Nashik Simhastha Kumbh Mela | महापालिका आयुक्त अध्यक्ष; जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह १० सदस्यांचा समावेश
Kumbh Mela 2026
Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० प्रमुख महापालिका क्षेत्रांमध्ये हे प्राधिकरण कार्यरत होणार असून, त्यात नाशिकचाही समावेश आहे.

Kumbh Mela 2026
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान साधु - महंत, भाविक आणि नाशिककरांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या प्राधिकरणाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४१-अ अंतर्गत या प्राधिकरणांची स्थापना केली आहे. राजपाल्यांच्या आदेशानुसार याबाबतची अधिसूचना जारी केली असून, शासनाच्या अपर मुख्य सचिव विनीता वेद सिंगल यांनी ती प्रसिद्ध केली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रत प्रसिद्ध झाला आहे.

या निर्णयानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-ोंबिवली, नागपूर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, वसई-विरार आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांमध्ये स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत राहणार आहे. शहरी भागातील आपत्तींचे नियोजन, प्रतिबंध, तातडीचा प्रतिसाद आणि विविध यंत्रणामधील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा या निर्णयामागचा उद्देश आहे.

Kumbh Mela 2026
CM Devendra Fadnavis | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर!

शहरांमध्ये वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येची घनता लक्षात घेता पूर, आग, इमारत कोसळणे, साथीचे रोग, वाहतूक कोंडी तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभाग यांच्यात समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

प्राधिकरणाची रचना:

संबंधित महापालिकेचे आयुक्त हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर जिल्हाधिकारी पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक, प्रादेशिक विकास प्राधिकरणा प्रमुख, मुख्य अग्निशमन अधिकारी, विद्युत विभागाचे शहर अभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता, वैद्यकीय अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. अतिरिक्त आयुक्त किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त हे सदस्य - सचिव असतील.

Kumbh Mela 2026
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

सिंहस्थासाठी महत्वपूर्ण पाऊल:

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येने साधू-महंत आणि भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, आग व पूर यांसारख्या आपत्तींचा संभाव्य धोका, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांना विशेष महत्त्व राहणार आहे. शहरी आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणामुळे आपत्कालीन नियोजन आणि प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news