Shri Venkatesh Balaji Mandir Nashik | ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवात दोनशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा कायम

Shri Venkatesh Balaji Mandir Nashik | वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि 'व्यंकटचला व्यंकटरमण गोविंदा'च्या जयघोषात येथील ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सव अंतर्गत विविध धार्मिक घेण्यात येत आहेत.
Shri Venkatesh Balaji Mandir Nashik
Shri Venkatesh Balaji Mandir Nashik
Published on: 
Updated on: 

बाळाजी ब्रह्मोत्सव
नाशिक : पुढारी वृत्तसेवा


वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि 'व्यंकटचला व्यंकटरमण गोविंदा'च्या जयघोषात येथील ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सव अंतर्गत विविध धार्मिक घेण्यात येत आहेत. त्यानंतर सायंकाळी सुदर्शनचक्राच्या परिक्रमेची पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली. बालाजी ब्रह्मोत्सवामध्ये दोनशे वर्षांहून अधिक काळापासून जपली जाणारी ही परंपरा धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत आहे.

Shri Venkatesh Balaji Mandir Nashik
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

ध्रुव बालाजीवाले यांच्या हस्ते श्री व्यंकटेशाचा पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी ऋग्वेदाच्या नवव्या मंडलातील पवमान सूक्ताचे पठण करण्यात आले. पावित्र्य, शुद्धी आणि मंगलतेची प्रार्थना करणाऱ्या वैदिक मंत्रोच्चारांनी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
श्री व्यंकटेशाचे आयुध मानल्या जाणाऱ्या सुदर्शनचक्राच्या परिक्रमेच्या पारंपरिक रथयात्रेत वाद्यंत्राचा निनाद आणि 'गोविंदा'चा जयघोष करण्यात आला. बालाजीवाले, मर्ती, देशमुख, गोसावी, गाढवे, पाटील, भग्र, जोशी, चांदसरे, भानोसे, देसाई, गर्भे आदी कुटुंबांनी श्री व्यंकटेशाच्या सेवेत सहभाग घेतला. दोनशे वर्षांहून अधिक काळापासून परंपरा जपली जात आहे. बालाजी मंदिराशी आणि या ऐतिहासिक परदेशी जोडलेले नाते आजही कायम असल्याने रथभेट केवळ धार्मिक विधी न राहता नाशिकच्या सांस्कृतिक स्मृती जपणारा वारसा ठरली आहे.

Shri Venkatesh Balaji Mandir Nashik
CM Devendra Fadnavis | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर!

परंपरेतून सांस्कृतिक वारशाचे दर्शन:

श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव हा नाशिकच्या धार्मिक जीवनातील महत्त्वाचा सोहळा मानला जातो. पवमान अभिषेक, वैदिक मंत्रपठण, सुदर्शनचक्राची परिक्रमा आणि पारंपरिक रथयात्रा यातून या उत्सवाचे वैशिष्ट्य अधोरेखित होत आहे. श्रद्धा, परंपरा आणि कृतज्ञतेचा संगम ब्रह्मोत्सव सोहळ्यात दिसून येत आहे. या परंपरांच्या जतनातून नाशिकच्या सांस्कृतिक क्षमतेची वीण अधिक घट्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news