Trimbakeshwar Temple VIP Darshan Scam | व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली लूट! त्र्यंबकेश्वर देवस्थान रॅकेटमधील आणखी दोघे अटकेत

Trimbakeshwar Temple VIP Darshan Scam | आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता
Trimbakeshwar Jyotirling Temple
Trimbakeshwar Temple ControversyPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या बनावट दर्शनपास रॅकेटमध्ये पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. अभिषेक कडलग आणि ओम कडलग या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ४ झाली आहे.

Trimbakeshwar Jyotirling Temple
TCS Women Harassment Case | आयटीतील लैंगिक शोषण चौकशीसाठी तथ्य शोध समिती

यापूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पुरुषोत्तम कडलग आणि त्यांचा साथीदार गोटीराम मनाजी पेहरे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.

११ एप्रिलला पंचवटीतील काही भाविकांना २०० रुपयांचा पास घेतल्यानंतरही लवकर दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवले होते. एका भाविकाकडून ३ हजार, तर इतरांकडून २ हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला.

Trimbakeshwar Jyotirling Temple
Ashok Kharat Financial Scam | अशोक खरात प्रकरणात 17 कोटींचे संशयास्पद व्यवहार! राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यांतून फुटले मोठे घबाड

या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांनी भाविक बनून मंदिर परिसरात जात पुरावे गोळा केले असता एका दिवसातच मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली होत असल्याचे उघड झाले.

या माहितीच्या आधारे रॅकेटचे धागेदोरे पुरुषोत्तम कडलग यांच्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news