Simhastha Kumbh Mela | त्र्यंबकला सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाची जय्यत तयारी

Simhastha Kumbh Mela | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्या सोहळा
Simhastha Kumbh Mela Flag Hoisting
Simhastha Kumbh Mela Flag Hoisting
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या या सोहळ्यासाठी अवघी तीर्थनगरी त्र्यंबकेश्वर सज्ज झाली असून, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस दल आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Simhastha Kumbh Mela Flag Hoisting
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश

कुशावर्त तीर्थावर दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री छगन भुजबळ,

दादा भुसे, डॉ. उदय सामंत, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुहास कांदे आणि आमदार हिरामन खोसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशासाठी निमंत्रितांना प्राधान्य देण्यात आले आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहराचा कायापालट झाला असून, तयारी लक्षवेधी ठरत आहे.

यात श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पवित्र कुशावर्त तीर्थावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी डोळ्यांचे पारणे फेडत आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि इमारतींवरही दिव्यांची सजावट करण्यात आली आहे.

संपूर्ण शहरात जागोजागी भगवे ध्वज, पताका, जाळ्या आणि पडदे उभारण्यात आले असून, यामुळे संपूर्ण नगरी सिंहस्थाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. ध्वजारोहणापूर्वी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात दवंडी पिटवून आवाहन करण्यात आले आहे.

Simhastha Kumbh Mela Flag Hoisting
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात ध्वजारोहण का केले जाते? जाणून घ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थातील 'या' परंपरेचे महत्त्व!

कडक पोलिस बंदोबस्त

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा आणि लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. शहरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस फौजफाटा, शीघ्र कृती दल आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. सुरक्षेचा प्रत्येक पैलू तपासून पाहिला जात असून, ध्वजारोहण सोहळ्याविषयी आता साधू-महंत, भाविक आणि नागरिकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पावासामुळे राष्ट्रपतींच्या प्रवासात बदल

त्र्यंबकेश्वर परिसरात सध्या पावसाचे सावट असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टर दौऱ्यात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिकहून रस्ते मार्गाने मोटारींच्या ताफ्यासह त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करतील. त्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर विशेष खबरदारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.