Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात ध्वजारोहण का केले जाते? जाणून घ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थातील 'या' परंपरेचे महत्त्व!

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ ध्वजारोहणाने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार

Nashik  Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Pudhari News
Published on: 
Updated on: 

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela :

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : प्राचीन काळापासून दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशीही त्याची ओळख आहे. हा केवळ धार्मिक मेळावा नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. यंदा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या दिवशी आखाड्यांचे धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होईल. जाणून घेऊया ध्वजारोहणाचे महत्त्व आणि परंपरा याविषयी...

यंदा ध्वजारोहणाचा शुभ मुहूर्त कधी?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:०२ चा काळ हा अभिजित मुहूर्त असला, तरी या वेळेचे मुख्य महत्त्व म्हणजे याच क्षणी गुरुंचा सिंह राशीमध्ये अधिकृत प्रवेश होत आहे. या प्रवेशासह सिंहस्थ पर्वाला आरंभ होतो आणि म्हणूनच याच मुहूर्तावर विधिवत ध्वजारोहण केले जाते, अशी माहिती नाशिकमधील शु.य.मा. ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष, पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल यांनी दिली.


Nashik  Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी देशभरातून आणि जिल्ह्यातून 236 धार्मिक संस्थांचे अर्ज सादर

ध्वजारोहणाचे महत्त्व

कुंभमेळ्यात उभारलेला ध्वज जेव्हा वायुलहरींवर फडकतो, तेव्हा त्या ध्वजाच्या माध्यमातून वातावरणातील नकारात्मक शक्तींचा (निगेटिव्ह पॉवर्स) नाश होतो. जितक्या दूरपर्यंत या वायुलहरी जातात, तिथपर्यंत केवळ सकारात्मक ऊर्जेचा (पॉझिटिव्ह पॉवर्स) संचार राहतो, असे शास्त्रात नमूद आहे.


Nashik  Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela Nashik | विश्वविक्रमी शंखनादाने आणि ध्वजारोहण सोहळ्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या स्वागताला प्रारंभ

शौर्य आणि त्यागाचे प्रतीक

ध्वजावर असणारा 'सिंह' हा पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक मानला जातो, तर ध्वजाचा 'भगवा रंग' हा त्यागाचे प्रतीक आहे. याशिवाय, ध्वजावर सूर्य आणि चंद्राची प्रतीके असून, त्याचा अर्थ 'यावच्चंद्रदिवाकरौ' म्हणजेच जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या पावन भूमीत सिंहस्थ कुंभमेळा अविरत भरत राहील, असा शाश्वत संदेश यातून दिला जातो, असेही शुक्ल यांनी स्‍पष्‍ट केले.


Nashik  Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था , रिंग रोड पार्किंग आणि शटल बससेवेची मोठी घोषणा

आखाड्यांच्या उपस्थितीची घोषणा

संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या भव्य आणि पवित्र महाकुंभ सोहळ्यात ध्वजारोहण ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. आखाड्यांचे आराध्य दैवत, परंपरा आणि महाकुंभातील उपस्थितीचे प्रतीक म्हणून ध्वजारोहणाकडे पाहिले जाते. महाकुंभमेळ्यात सर्व १३ प्रमुख आखाडे (आवाहन, निरंजनी, जुना, अग्नि, इत्यादी) आपापल्या छावण्या (पडाव) स्थापन करतात. ध्वजारोहण करून आखाडे अधिकृतपणे कुंभातील आपल्या उपस्थितीची आणि अनुष्ठानाची सुरुवात घोषित करतात.

ग्रंथांमध्ये ध्वजारोहणाचा स्पष्ट उल्लेख

  • सनातन धर्मातील 'नारद पुराण', 'अग्नि पुराण' आणि 'कुंभ माहात्म्य' यांसारख्या ग्रंथांमध्ये ध्वजारोहणाचा स्पष्ट उल्लेख मिळतो:

  • 'ध्वजः सर्व जयप्रदः': शास्त्रात ध्वजाला विजय, धर्म आणि सत्याचे प्रतीक म्हटले आहे. कोणत्याही मोठ्या धार्मिक अनुष्ठानात किंवा कुंभासारख्या महायज्ञात जोपर्यंत धर्मध्वजाची स्थापना होत नाही, तोपर्यंत ते अनुष्ठान पूर्ण मानले जात नाही.


Nashik  Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela
Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचे राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण

कुंभातील ध्वज अमृतकलशाचे प्रतीक

कुंभाच्या पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताच्या कलशाचे रक्षण करण्यासाठी देव आणि ऋषी-मुनींनी विशिष्ट चिन्हे व ध्वज वापरले होते. त्यामुळे कुंभातील ध्वज हा अमृत आणि अमरत्वाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचे प्रतीक मानला जातो.

ध्वजाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये

  • ध्वजदंडाची उंची: आखाड्यांचा धर्मध्वज हा सामान्य नसून ५१ फूट ते ५५ फूट किंवा त्याहून अधिक उंच लाकडी किंवा धातूच्या खांबावर उभारला जातो.

  • रंग आणि चिन्हे: प्रत्येक आखाड्याच्या ध्वजाचा रंग (सामान्यतः भगवा, लाल किंवा पिवळा) आणि त्यावर असलेली चिन्हे (उदा. त्रिशूळ, गदा, चक्र, डमरू) भिन्न असतात, जे त्यांच्या संप्रदायाचे व परंपरेचे प्रतिनिधित्व करतात.

  • विशेष मंत्रोच्चार: ध्वजारोहण करताना आखाड्यांचे महामंडलेश्वर, श्रीमहंत आणि साधू-संत विशेष वैदिक मंत्र आणि कुलदैवताच्या जयघोषात हे विधी पार पाडतात.

ध्वजाची परंपरा केव्हापासून सुरू झाली?

  • कुंभमेळा आणि ध्वज परंपरेची मुळे वैदिक काळात आढळतात. ऋग्वेदात आणि महाभारतातही युद्ध किंवा महायज्ञाच्या वेळी 'धर्मध्वज' उभारण्याचे उल्लेख येतात.

  • महाकुंभातील आजचे संघटित स्वरूप आणि आखाडा परंपरेची खरी सुरुवात आदि शंकराचार्य यांनी केली. ८ व्या शतकात सनातन धर्माचे संघटन आणि रक्षण करण्यासाठी शंकराचार्यांनी आखाड्यांची स्थापना केली.

  • आखाड्यांच्या स्थापनेसोबतच महाकुंभात ध्वजारोहणाची ही परंपरा औपचारिकरीत्या दृढ झाली. जेव्हापासून आखाड्यांनी कुंभात भाग घेण्यास सुरुवात केली (सुमारे १२०० वर्षांहून अधिक काळापासून), तेव्हापासून ध्वजारोहण ही कुंभाची पहिली आणि सर्वांत महत्त्वाची अधिकृत धार्मिक कृती बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.