Trimbakeshwar | श्रावणातील तिसर्‍या सोमवारसाठी वाहतूक मार्गात बदल; कोणते आहेत पर्याय.. बघा एका Click वर

वाढत्या गर्दीचे नियोजनासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले वाहतूक मार्गात बदल
वाहतूक मार्गात बदल / 
Changes in traffic routes
वाहतूक मार्गात बदल / Changes in traffic routesPudhari File Photo
Published on
Updated on

Changes in traffic routes and special arrangements for outdoor parking announced

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार (दि. 11) यानिमित्त लाखो भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा व त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दाखल होणार आहेत. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल व बाह्य पार्किंगची विशेष व्यवस्था जाहीर केली आहे.

वाहतूक मार्गात बदल / 
Changes in traffic routes
Shravan Natural Beauty | श्रावणात नटलेले निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावतेय

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पवार यांनी याबाबत माहिती दिली.

दि. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर शहरात नाशिककडून येणार्‍या खासगी वाहनांना तळेगाव फाटा येथे, पालघर व मोखाडा मार्गे येणार्‍यांना अंबोळी गावाजवळ, तर मुंबईकडून येणार्‍यांना पहीणे गावाजवळ थांबवण्यात येणार आहे. या ठिकाणांहून भाविकांना एसटी व सिटीलिंक बसद्वारे त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचवले जाईल. पोलिसांनी भाविकांना गर्दी टाळण्यासाठी शक्य तितका बससेवेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Nashik Latest News

वाहतूक मार्गात बदल / 
Changes in traffic routes
Shravan mahina 2025: श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ, यंदा 4 सोमवार, शिवमुठीसाठी धान्य काेणते वाचा?

शहर व जिल्हा पोलिस प्रशासनाकडून वाहतूक मार्गात बदल

तिसर्‍या आणि चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणेसाठी शहर व जिल्ह्यातून हजारो भाविक जात असतात. त्यासाठी ठक्कर आणि मेळा बसस्थानकातून विशेष बसेस सोडल्या जात असतात. या सर्व पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे.

रविवारी (दि. 10) दुपारी 12 ते सोमवारी (दि. 11) रात्री 8 पर्यंत रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता इतर सर्व खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंद राहणार आहे. याशिवाय ठक्कर बसस्थानक परिसरातील तालुका पोलिस ठाणे, मेळा बसस्थानक, मनसे कार्यालय, बाल सुधारालयासमोरील रस्त्यावर एसटी, सिटी बस वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे. या वाहनांना तालुका पोलिस ठाणे ते ठक्कर बाजारकडे जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नल मार्गे वळविण्यात आली आहे. ठक्कर बाजार मनसे कार्यालयाकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक ही मोडक सिग्नल, सीबीएसमार्गे येईल. रुग्णवाहिका, अग्निशमन या वाहनांना मात्र, सर्वत्र प्रवेश खुला राहणार आहे.

येथे असेल पार्किंगची सुविधा

नाशिककडून येणार्‍या भाविकांसह जळधर गिरणारे मार्गे येणार्‍यांसाठीही अंबोळी येथे पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. मुंबई, इगतपुरी, घोटी मार्गे येणार्‍यांसाठी पिंप्री येथे पार्किंगची सोय असेल. तर तात्पुरते पर्यायी मार्ग नाशिक- सातपूर- गोवर्धन- गिरणारे- देवगाव- अंबोळी- जळधर तसेच जळधर- अंबोळी- देवगाव- गिरणारे- नाशिक असे असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news