Dandakram Parayan in Kashi- त्र्यंबकचे अद्वैत आणि समर्थ बंधू करणार काशीत दंडक्रम पारायण

त्र्यंबकचे अद्वैत आणि समर्थ बंधू करणार काशीत दंडक्रम पारायण
Dandakram Parayan in Kashi
Dandakram Parayan in Kashi
Published on: 
Updated on: 

नाशिक : भारतीय वेदपरंपरेचे जतन आणि संवर्धनाच्या उद्देशाने काशी येथे श्री शुक्ल यजुर्वेद कंठस्थ दंडक्रम पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पारायणास दि. २७ ऑक्टोबरपासून प्रारंभहोणार आहे. हे पारायण दि. १७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे १८ वर्षीय वेदोपासक अद्वैत शैलेंद्र काकडे आणि १३ वर्षीय वेदोपासक समर्थ शैलेंद्र काकडे हे दोन अल्पवयीन बंधू कंठस्थ दंडक्रम पारायण सादर करणार आहेत. प्रशांत जोशी आणि किरण पाठक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

एक हजार वर्षांच्या इतिहासात कमी वयातील विश्वविक्रमी ऐतिहासिक पारायण असा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला आहे. कठीण आणि प्रगत स्वरूपाच्या या पारायणासाठी विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, स्मरणशक्ती आणि वेदपठणातील प्रावीण्यास विशेष महत्त्व आहे. याचे आयोजन काशीतील हनुमान घाट परिसरातील कांची शंकराचार्य मठात होत आहे. दि. २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या काळात दररोज ८ ते दुपारी १२ या वेळेत पारायण होईल. दंडक्रम पारायण हे वेदपठणातील विशेष पद्धतींपैकी एक आहे.

यात शब्दांचा ठराविक क्रमाने पुनरुच्चार होतो. मंत्र पाठ असणे पुरेसे नसून, शब्दक्रम आणि उच्चारांचे अचूक ज्ञानही आवश्यक असते. अशा पारायणास अभ्यास आणि कठोर साधना लागते. यासाठी स्वामी कांची कामकोटी पीठ शंकराचार्य, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, चतुर्वेदशास्त्री विश्वनाथजी देव गुरुजी आणि श्रीकृष्णभट्ट गोडसे गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळाले. काशी ही वैदिक परंपरेतील महत्त्वाची नगरी आहे. अशा पवित्र स्थळी अल्पवयीन वेदोपासकांकडून होणारे हे पारायण वेदविद्येच्या अभ्यासकांसाठी आणि भारतीय संस्कृतीत रुची असणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे.

प्राचीन वेदपठण परंपरेचे जतन, वेदाध्ययनाविषयी जागरूकता आणि नव्या पिढीत वैदिक ज्ञानाबद्दल रुची निर्माण यासाठी याकडे पाहिले जात आहे. या माध्यमातून वेदविद्येतील साधना आणि गुरुपरंपरेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.

परीक्षक म्हणून जोशी आणि पाठक

या उपक्रमात वेदभास्कर प्रशांत जोशी आणि किरण पाठक हे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. वेदपठणातील अचूकता, मंत्रोच्चार आणि पारायण पद्धतीशी संबंधित बाबींच्या परीक्षणाला विशेष महत्त्व असते. त्यांच्या सहभागामुळे या उपक्रमाच्या आयोजनाला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

Dandakram Parayan in Kashi
Nashik | नाशिक कारागृहामधील भ्रष्टाचार अन् सुरक्षेतील त्रुटी !

अल्पवयीन वेदोपासकांचे योगदान

पारायणामध्ये सहभागी वेदोपासक अद्वैत (१८) व वेदोपासक समर्थ (१३) यांनी कमी वयात शुक्ल यजुर्वेदाचे कंठस्थ दंडक्रम पारायण करण्याचा त्यांचा प्रयत्न वेदाध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. वेदांचे मंत्र, अचूक उच्चार, स्वर आणि विशिष्ट क्रम लक्षात ठेवण्यासाठी सराव, एकाग्रता, गुरूंचे मार्गदर्शन त्यांनी प्राप्त केले आहे.

Dandakram Parayan in Kashi
Simhastha Flag Hoisting | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 31 ऑक्टोबर रोजी एकाच मुहूर्तावर होणार ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news