Simhastha Flag Hoisting | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 31 ऑक्टोबर रोजी एकाच मुहूर्तावर होणार ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा

Simhastha Flag Hoisting | सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी ३१ ऑक्टोबरला ; प्राधिकरण आयुक्तांची रामतीर्थावर पाहणी
Simhastha Flag Hoisting
Simhastha Flag Hoisting
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वाची औपचारिक नांदी दि. २५ ऑक्टोबर रोजी भव्य शंखनादाने होणार आहे. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.

Simhastha Flag Hoisting
Kumbh Mela Nashik | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामघाट, पंचवटी व कुशावर्त परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव

या सोहळ्याच्या माध्यमातून शैव - वैष्णव परंपरेचा संगम, गोदावरीचे धार्मिक महत्त्व, आदिवासी संस्कृतीचे दर्शन, शंखनाद आणि गोदा महाआरतीच्या माध्यमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी रामतीर्थावर पत्रकार परिषदेत दिली.
समुद्रमंथनातील चौदा रत्नांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शंखाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य शंखनादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा

ध्वजारोहणानंतर सायंकाळी नाशिकमध्ये होणाऱ्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री, पालकमंत्री, विविध मान्यवर, शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधु - संत तसेच जगद्गुरु, शृंगेरी मठाचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेचे महत्त्व आणि धार्मिक संप्रदायांमधील एकात्मता या कार्यक्रमातून अधोरेखित केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील नवीन घाटावर उभारलेल्या ध्वजस्तंभावर अनावरण यावेळी होणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रांवर समांतर होणाऱ्या या सोहळ्यामुळे सिंहस्थ पर्वाच्या तयारीला धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान मिळणार आहे.

कुंभ गीत होणार सादर

मुख्य सोहळ्यात सिंहस्थ महाकुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे. भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ यांवर आधारित दोन विशेष तपाल तिकीटांचे प्रकाशन होईल. शिवाय कॉफी टेबल बुक आणि अधिकृत कुंभ गीताचेही अनावरण करण्यात येणार आहे.

६,५०० आदिवासी बांधवांचा सहभाग

गोदा महाआरतीमध्ये सुरगाणा, सटाणा आणि पेठ या आदिवासीबहुहुल भागातील सुमारे ६,५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून ही महाआरती होणार आहे. धार्मिक परंपराबरोबर आदिवासी समाजाचा सहभाग जोडण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाला महत्त्व आले आहे.

Simhastha Flag Hoisting
Ganesh Immersion Procession Route | नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलणार; पंचवटी कारंज्यावरून नवा रूट प्रस्तावित

शैव - वैष्णव परंपरेचा संगम

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमंत्रण पत्रिकेची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आली आहे. पंचवटीतील प्रभू श्रीरामांचा वैष्णव वारसा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची शैव परंपरा यांचा संगम या पत्रिकेत साधला आहे. पत्रिकेत गोदामाईची प्रतिकृती मूर्ती, पितळी कलशातील ब्रह्मगिरीचे पवित्र जल, अष्टगंध, घंटा, तुळशीची माळ, रुद्राक्ष माळ, गोड भेट, सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा लोगो असलेली लॅपेल पिन आणि विशेष उपरणे यांचा समावेश होता. राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांना मुख्यमंत्री कार्यालयाशी समन्वय साधून सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येत असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news