जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाने व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (दि. 23) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश देण्यात आले. यामध्ये नाशिक परिक्षेत्रातील 59 अधिकाऱ्यांच्या तर जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक 14 तर जळगाव जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षक, नाशिक परिक्षेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक 13 तर जळगाव जिल्ह्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, नाशिक परिक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक 32 तर जळगाव जिल्ह्यातील 7 पोलीस उपनिरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या चे आदेश पारित झालेले आहेत.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांची धुळे, ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव यांची नाशिक ग्रामीण, शिल्पा गोपीचंद पाटील नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. तर राजेंद्र दामोदर कुटे, पांडुरंग विठ्ठल पवार हे नाशिक ग्रामीण व जळगावला आले आहेत. तर दीपक किसनराव बुधवंत हे नंदुरबार हुन जळगावला आलेले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता मधुकर नारखेडे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली असून अहमदनगर येथून महेश मोहनराव येसेकर हे जळगावला बदलून आलेले आहेत.
तर पोलीस उपनिरीक्षक जळगाव येथून गोपाळ कडू देशमुख, रूपाली सुरेश महाजन, चंद्रकांत बुधा पाटील, किशोर रामेश्वर पाटील, गंभीर आनंदा शिंदे यांची नाशिक ग्रामीणला तर दिपाली नंदराम पाटील, मसलोद्दीन जैनुद्दीन शेख यांची धुळे येथे बदली झालेली आहे.
तर पोलीस उपनिरीक्षक नाशिक ग्रामीण वरून विजय सोनू गायकवाड, बबन दिनेश पाटोळे, चंद्रकांत शिवाजी दवंगे, संजय तुकाराम विधाते हे नाशिक ग्रामीण मधून जळगावला आले आहेत. तर कैलास महादू दामोदर धुळ्यावरून प्रिया प्रसाद वसावे नंदुरबार हुन जळगाव येथे बदली झाली आहे.