Nashik Traffic Changes | नाशिकमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल; 'हे' मार्ग राहणार बंद!

Nashik Traffic Changes | भद्रकाली, नाशिकरोड, इंदिरांनगर परिसरात बुधवारसाठी निर्बंध
Traffic Change
Traffic ChangeFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईद-ए-मिलाद (मो. पैगंबर जयंती) निमित्त बुधवारी (दि. २६) शहरातील भद्रकाली, नाशिकरोड आणि इंदिरा नगर पोलिस ठाणे हद्दीत जुलूस मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेने विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. मिरवणूक मार्गावर काही काळ सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Traffic Change
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज; 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण

भद्रकाली परिसरात चौक मंडई, बागवानपुरा, कडवा मशिद, शिवाजी चौक, मीरा दातार दर्गा, शिंगे गल्ली, आझाद चौक, चव्हाटा देवी मंदिर, सुभाष वाचनालय, बुधवार पेठ, आदमशहा दर्गा, संत नामदेव पथ, काझीपुरा पोलिस चौकी, काफिलापुरा, उम्मेद मशिद आदी भागांतून मिरवणूक जाणार आहे.

सारडा सर्कल ते हाजी अली पॉइंटकडे जाणारी वाहतूक वडाळा नाका, आडगावकर नगरमार्गे वळविली जाणार आहे. शिवाजी चौक ते मिरवणूक मार्गावर जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. नाशिकरोड परिसरात बिटको सिग्नल ते विहितगाव सिग्नल हा मिरवणुकीचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करून देवळाली कॅम्प, सुयोग हॉस्पिटल, आर्टिलरी सेंटर रोड, खोडे मळा, रोहिदासवाडी, विहितगाव आदी पर्यायी मार्गांचा वापर केला जाणार आहे.

Traffic Change
Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

इंदिरानंगर परिसरात वडाळागाव गोसिया मशिद, बंटी कॉर्नर, रजा चौक, अलिफशहा सोसायटी, गणेशनगर, वडाळा-पाथर्डी रोड, संतोष चौक, सादीकनगर, मांगीरबाबा चौक, माळी गल्ली, खंडोबा चौकमार्गे गोसिया मशिदपर्यंत मिरवणूक राहणार आहे. मदिना चौक ते कलानगर मार्गावर प्रवेशबंदी असून, विठ्ठल मंदिर, वडाळा सर्कल, अशोका हॉस्पिटल, साईबाबा सिग्नलमार्गे वाहतूक वळविली आहे.

वाहतूक बदल तपशील

बंद मार्ग:

  • भद्रकाली: शिवाजी चौक ते मिरवणूक मार्ग; सारडा सर्कल ते हाजी अली पॉइंटकडे जाणारा मिरवणुकीचा मार्ग.

  • नाशिकरोड: बिटको सिग्नल ते विहितगाव सिग्नल.

  • इंदिरानंगर: मदिना चौक ते कलानगरकडे जाणारा मार्ग तसेच कलानगर ते मदिना चौक मार्ग.

पर्यायी मार्ग:

  • भद्रकाली: सारडा सर्कल - वडाळा नाका - आडगावकर नगरमार्गे पुढे वाहतूक सुरू राहणार.

  • नाशिकरोड: सुयोग हॉस्पिटल - आर्टिलरी सेंटर रोड- खोडे मळा - रोहिदासवाडी- विहितगाव या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार.

  • इंदिरानंगर: मदिना चौक - विठ्ठल मंदिर - वडाळा सर्कल - अशोका हॉस्पिटल - साईबाबा सिग्नल - कलानगर या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news