Ravana Dahan : आज ५१ फुटी रावणदहन : विजयोत्सवाची तयारी पूर्ण

चतुःसंप्रदाय आखाड्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने आयोजन
Ravana Dahan
Ravana Dahan : आज ५१ फुटी रावणदहन : विजयोत्सवाची तयारी पूर्ण File Photo
Published on
Updated on

Today 51 feet Ravana Dahan: Preparations for Victory Festival are complete

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पशनि पुनित नाशिकभूमीत ५८ वर्षांची जुनी परंपरा असलेल्या चतुः संप्रदाय आखाड्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने गोदापटांगणावर रावणदहन केले जाते. याची तयारी पूर्ण झाली असून, यंदा ५१ फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. विजयोत्सव मिरवणूक आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या रावण-वानरसेनेच्या प्रतिकात्मक युद्धासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Ravana Dahan
Online Fraud : ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक, टास्क जॉबच्या नावाखाली गंडा

कपालेश्वर मंदिरासमोरील चतुः संप्रदाय आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी १९६७ मध्ये प्रथम रामकुंड परिसरात रावणदहनाची परंपरा सुरू केली. पुढे ही परंपरा कृष्णचरण दास यांनी सुरू ठेवली. यंदा ५१ फूट उंचीच्या रावणाचा पुतळा मूर्तिकार राजू आढाळकर यांनी तयार केला आहे. चतुः संप्रदाय आखाड्यातर्फे नवरात्रोत्सातील दशमीनिमित्त होणाऱ्या इतर विविध कार्यक्रमांची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.

सुमारे १५ ते २० हजार नागरिक गोदाकाठी रावणदहन बघण्यासाठी गर्दी करतात. दहनापूर्वी श्री काळाराम मंदिर ते रामकुंड अशी मिरवणूक काढली जाते. त्यामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमान यांच्यासह वानरसेनेच्या वेशभूषेत भाविक सहभागी होत असतात. श्रीराम-रावणामधील युद्धाचे प्रसंग प्रतिकात्मक पद्धतीने युद्ध खेळून प्रभावीपणे सादर केले जातात. रामकुंडाजवळील पटांगणावर तात्पुरता मंच करून मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित बाण मारून रावणदहन केले जाणार आहे. फटाक्यांची आतषबाजीही केली जाणार आहे.

Ravana Dahan
City Bus Services : सिटीलिंकच्या तिकिटांचे पैसे वाहकाच्या खिशात

गांधीनगर येथील रामलीला मैदानावर यावर्षी ६५ फूट उंच रावणाचे दहन करण्यात येणार असून, या भव्य परंपरेला तब्बल ७० वर्षे पूर्ण होत आहेत.

पावसाची उयजीप : यंदा पावसाने नवरात्रोत्सवात धुमाकूळ घातला असून, काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता गुरुवारी (दि.२) विजयादशमीला बुधवारी (दि.१) सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने भाविकांमध्ये नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलेला नाही. समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news