

चांदवड (नाशिक) : चांदवड तालुक्यातील हरसूल हरनुल गाव शिवारातील डोंगर टेकडीत गेल्या तीन ते चार दिवसापासून वाघिणीचे तीन पिल्लांसह वारंवार दर्शन होत आहे.
ही वाघीण अन्न पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळी डोंगरातून गावाकडे येत असल्याने गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. वाघीण आपल्या पिल्लांकरीता अन्न पाण्याच्या शोधार्थ पिल्लांमुळे वाघिण आक्रमक होत असल्याचे गावकऱ्यांनी माहिती दिली आहे.