नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संशयित पतीला सुरगाणा पोलिसांकडून गुजरातमध्ये अटक
Wife Killed By Husband
संशियत आरोपी Pudhari Photo
Published on
Updated on

सुरगाणा प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे गुरुवारी (दि.19) पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी हत्येनंतर फरार झाला होता. शनिवारी (दि.२१) रोजी संशयित आरोपी सिताराम दामू राऊत (३०) कोटमदर (गुजरात) येथून सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीस रविवारी (दि.21) दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरगाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी सांगितले आहे.

Wife Killed By Husband
अमरावती : अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या

सुरगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत झालेल्या मुलीची आई उर्मिला मनसू गावित (४४, रा. मोठामाळ) हिने दिलेल्या फिर्यादीवरून सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे गुरुवारी (दि.19) रात्री संशयित सिताराम दामू राऊत (३०) याने पत्नी कला राऊत (२६) हिचा राहत्या घरी लोखंडी पावडीने मानेवर वार करत ठार केल्याची तक्रार नोंदवली होती.

कौर्याची परिसीमा! पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे, सूटकेसमध्ये घालून दिले फेकून 

याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित, नितीन ढेपले, कैलास मानकर, कविराज गावित, रमेश चव्हाण, संदिप पगारे, तुळशिराम चौधरी चेतन बागुल आदि तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news