

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क । नाशिक परिसरातील काहींची पक्षातूल एक्झिट होत असल्याच्या चर्चा असून या चर्चा म्हणजे पंतगबाजी सुरू आहे. त्यामुळे पक्षासाठी अडचणीचे ठरणाऱ्यांना पक्षातून दूर करण्यात आले आहे. तसेच नाशिकमध्ये शिवसेना नेते, पदाधिकारी पक्षासोबतच आहे. नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले.
सुधाकर बडगुजर आमच्या पक्षात नाहीत. त्याबाबत मला काही माहिती नाही. कोण जातंय कोण नाही याबाबत पतंगबाजी सुरु आहे”, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच नाशिकमधील ठाकरेंची शिवसेना मजबूत आहे. सर्व कार्यकर्ते जागेवर आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.
सुधाकर बडगुजर आमच्या पक्षात होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केले, आता ते कोणत्याही पक्षात जाऊ दे, त्याबाबत काहीही चर्चा होऊ दे, ते आता आमच्या पक्षात नाही, त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. तसेच काही नगरसेवक पक्ष सोडत असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे.
ज्यांना जायचे होते, ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचे होते, त्यांना दूर केले. आता फक्त नावे येत आहेत, चर्चा सुरू आहेत, ही फक्त हवेतील पंतगबाजी आहे. पक्षाला अडचणीचे ठरणाऱ्या माणसांना पक्षापासून दूर करण्यात आले आहे. नाशिकमधील शिवसेना मजबूत असून सर्व पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. या हवेतील चर्चाना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. बबनराव घोलप सध्या फिरता रंगमंच आहेत. त्यांचे पुत्र योगेश घोलप पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी संघर्ष करून आम्ही जागा मिळवली होती. ज्या नावांची चर्चा होत आहेत, त्यांनी आपल्याला संपर्क साधून आपण पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना काहीही अर्थ नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.