TCS Nashik Nida Khan Case | निदा खानवर अटकेची टांगती तलवार

निदा खानवर अटकेची टांगती तलवार
Nida Khan
Nida Khan casepudhari
Published on
Updated on

नाशिकरोड : महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ आणि धर्मांतर संबंधित आरोपांमुळे चर्चेत आलेल्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.२०) नाशिकरोड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत निकाल २७ एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे तिच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

नाशिकरोड न्यायालयात सुनावणी इन-कॅमेरा पद्धतीने पार पडली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना खानला अटक करण्याचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वीच दोन संशयितांना अटक करण्यात आली.

Nida Khan
Panaji Spa Prostitution Case |पणजी स्पा वेश्याव्यवसाय प्रकरणातील चारजणांना दिलासा; एकावर कारवाई कायम

महिला सहका-यांचा लैंगिक छळ आणि धर्मातर संबंधित आरोपांमुळे चर्चेत आलेल्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि. २०) नाशिकरोड सत्र न्यायालयात सुनावणी झाली, न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून येत निकाल २७एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे तिच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

नाशिकरोड येथील न्यायालयात ही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना निदा खानला अटक करण्याचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वीच दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या गुन्ह्यात मदत केल्याच्या आरोपातील संशयित निया खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Nida Khan
Goa Off The Record | ऑफ दि रेकॉर्ड

निदा खान गर्भवती असल्याचा वकिलाकडून दावा

निदा खानच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान ती गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल सादर करत मानवी दृष्टिकोनातून तिला दिलासा देण्याची मागणी केली. तसेच फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी मैत्रीचे संबंध होते तसेच नार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवादही केला. मात्र, सरकारी पक्षाने हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे सांगत अंतरिम जामीन नाकारण्याची मागणी केली. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

निदा खान शरण येणार?

न्यायालयाने निदा खानला अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे तिच्यावर अटकेत्वी तलवार कायम असल्याने आता पोलिस निदा खानचा शोध येऊन तिला अटक करणार की, निदा स्वतः पोलिसांना शरण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकआपआरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. या प्रकरणाला वार्मिक किवा राजकीय रंग देऊ नये. निदा खान गर्भवती असल्याने न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून विचार होईल, अशी आम्हाला खात्री वाटते.

- अॅड. राहुल कासलीवाल, आरोपी पक्षाचे वकील

आरोपीला कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांना तिला अटक करण्याचा अधिकार आहे. २७ एप्रिलला पुढील सुनावणी होईल.

- अॅड. मिलिंद कुरकुटे, पीहित पक्षाचे वकील

निदा खानवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा निदा खानवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गतदेखील गुना दाखल असल्याची माहिती सुनावणीवेळी समोर आली, सरकारी पक्षाकडून अॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती न्यायालयापुढे देण्यासाठी वेळ मागण्यात आली, तर आरोपीच्या वकिलाकडून या प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू होत नसल्याचे सांगत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे काही निवाडे सादर करण्यात आले. फिर्यादी व आरोप यांच्यात मैत्री होती. जातिवचक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असा दावा करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद २७ एप्रिलला सरकारी वकील आणि पीडितांच्या वकिलांनी आपले म्हणणे सविस्तर मांडण्यासाठी वेळ मागितली असून, या प्रकरणी आता २७ एप्रिल रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय जामीन मंजूर करायचा की नाही याबाबत निर्णय देणार आहे.

हा गंभीर गुन्हा असून, महिला आयोगानेही दखल घेतली आहे. सरकार पक्षाला सविस्तर मांडणीसाठी वेळ देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

अॅड. किरण बेंडभर, सरकारी वकील

निदा खान निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संबंधित लैंगिक छळ आणि कथित जवरदस्ती धर्मातर प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानविरोधात कंपनीने केलेल्या कारवाईचे निलंबनपत्र समोर आले आहे. दि. १ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रानुसार, प्रोसेस असोसिएट पदावर कार्यस्त असलेल्या खान हिला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तिच्याविरोधात गंभीर प्रकरण नोंदवण्यात आले असून, ती सध्या न्यायालयीन किया पोलिस कोठडीत असल्याचा उल्लेख पचात करण्यात आला आहे. यानंतर तिचा कंपनीच्या नेटवर्कवरील प्रवेश रद्द करण्यात आला असून, तिच्याकडे असलेली सर्व कंपनी मालमत्ता परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश गेईपर्यंत कामावर हजर राहू नये, किंवा वर्क फ्रॉम होम करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गोपनीयता पाळण्याचेही आदेश देण्यात आले असून उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिकमधील बीपीओमध्ये टीसीए‌ससंबंधित लैंगिक अत्याचार आणि धर्मातराच्या रॅकेटचे आरोप समोर आल्यानंतर निदा खान फरार आहे. तिच्या कुटुंबीयांनी मात्र हे आरोप राजकीय कटाचा भाग असल्याचे सांगत फेटाळले आहेत.

पतीच्या चौकशीतून काही धागेदोरे

नाशिक पोलिसांनी तिचा शोध वेगात सुरू ठेवला असून, तिच्या पतीच्या चौकशीतून काही धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने नियुक्त केलेल्या समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. काही तक्रारीमध्ये धार्मिक छळ, जबरदस्ती आणि विशिष्ट प्रथा पाळण्याचा दबाव टाकलारचे आरोप करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news