TCS Nashik Case | 'टीसीएस' प्रकरणात दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

TCS Nashik Case | नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धार्मिक भावना दुखावणे व विनयभंग प्रकरणात गुरुवारी (दि.१६) न्यायालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा सुनावणी पार पडली.
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धार्मिक भावना दुखावणे व विनयभंग प्रकरणात गुरुवारी (दि.१६) न्यायालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Arrested
TCS Nashik Case SIT Raid | त्र्यंबकेश्वर रोडवरील रिसॉर्टवर 'एसआयटी'चा छापा

या प्रकरणातील आरोपी रजा रफिक मेमन (३५) आणि शफी भिकन शेख (३६) यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी या दोघांना दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने त्यांना ताब्यात घेतल्याने ही सुनावणी महत्त्वाची ठरली.

सुनावणीदरम्यान ५० मिनिटे सरकारी व बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रूपाली नरवाडिया यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय दिला. सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी प्रभावी मांडणी केली. त्यांना अनिकेत आव्हाड यांनी सहाय्य केले.

आरोपी शफी शेख याने फिर्यादी मुलीला 'तुम मुझे बेहद पसंद हो, मेरी गर्लफ्रेंड बन जाओ' असे म्हणत प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. रजा मेमन याने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याला त्याच्या मोबाइलबाबत विचारणा करण्यात आली असता त्याने दिलेल्या उत्तरांत विसंगती आढळून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपास अधिक सखोल करण्याची गरज अधोरेखित झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेत आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Arrested
TCS Nashik Case SIT Raid | त्र्यंबकेश्वर रोडवरील रिसॉर्टवर 'एसआयटी'चा छापा

मोबाइलमधील संभाषण तपासणार

बचाव पक्षाचे वकील राहुल कासलीवाल यांनी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगत, एकाच स्वरूपाचे आरोप असताना वेगवेगळे गुन्हे दाखल करत कोठडी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, असा युक्तिवाद केला.

मोबाइल जप्तीसाठी पुरेसे प्रयत्न झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी प्रत्युत्तर देताना, प्रत्येक पीडितेची घटना वेगळी असून, गुन्ह्यांची पद्धत समान असली तरी तपास स्वतंत्रपणे होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. आरोपींच्या मोबाइलमधील संभाषण तपासणे महत्त्वाचे असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news