TCS Nashik Case SIT Raid | त्र्यंबकेश्वर रोडवरील रिसॉर्टवर 'एसआयटी'चा छापा

TCS Nashik Case SIT Raid | 'टीसीएस' प्रकरणात पार्थ्यांमधून शोषणाचा संशय
SIT Investigation
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या टीसीएस कंपनीशी संबंधित कारनाम्यांचा तपास करताना एसआयटीच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. संशयित आरोपी मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशिष्ट ठिकाणी पाट्यांचे आयोजन करत असल्याचे उघड झाले आहे.

SIT Investigation
TCS Nashik Harassment | "मूल हवे असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव"; नाशिक टीसीएस प्रकरणात नराधम आरोपीचा धक्कादायक खुलासा

या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल आनंद रिसॉर्टवर एसआयटी पथकाने छापा टाकत कारवाई केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ दरम्यान या रिसॉर्टवर रात्री उशिरापर्यंत पार्ध्या आयोजित केल्या जात होत्या.

या पाट्यांत कंपनीतील काही हिंदू मुलींना बोलावून त्यांना विविध प्रलोभने दाखवत फूस लावली जात असल्याचा संशय आहे. याच ठिकाणाहून धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. एसआयटीने छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे आणि गेस्ट रजिस्टर जप्त केले आहे.

SIT Investigation
Dhule Shirpur Highway accident: धुळे-शिरपूर महामार्गावर एसटीने दुचाकीला चिरडले, ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आई-वडील जखमी

त्यातून नियमित पाट्यांचे आयोजन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ पार्टी हॉलच नव्हे तर हॉटेलमधील खोल्याही मोठ्या प्रमाणावर बुक केल्या जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हॉटेल व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

बुकिंग कोणाच्या नावाने होत होते, पार्थ्यांचे स्वरूप काय होते आणि उपस्थित व्यक्ती कोण होत्या, याची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणातून आणखी पीडित मुली समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news