Suspicious Death | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेहडपाडा येथे पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात शोककळा

Suspicious Death | घटनेमागील नेमके कारण अध्याप अस्पष्ट
Suspicious Death
Suspicious Death
Published on: 
Updated on: 

हरसूल : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेहडपाडा येथील एका ओहोळाजवळील करंजीच्या झाडाजवळ पती-पत्नीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महादू किसन पवार (४५) आणि रेखा महादू पवार (४२, रा. बेहडपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

Suspicious Death
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील 63 धार्मिक संस्थांचा होणार कायापालट

बेहडपाडा शिवारातील ओहोळकाठावर महादू पवार हे जमिनीवर मृतावस्थेत मिळाले. त्यांच्या मानेवर गळफासाचे व्रण आढळले. पत्नी रेखा पवार या करंजीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांना कळवली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंगळवारी हरसूल ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करत दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात बारावी झालेला मुलगा आहे. हरसूल पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमागील नेमके कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही. सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news