Nashik Suryabhan Gadakh statue : पाथरे येथे कर्मवीर सूर्यभान गडाख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २६ रोजी अनावरण

Suryabhan Gadakh full-length statue unveiling at Pathare- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती; २६ हजार चौ. फुटांच्या शैक्षणिक संकुलाचेही उद्घाटन
पाथरे : कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलाची नूतन इमारत
पाथरे : कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलाची नूतन इमारत
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

माजी आमदार कर्मवीर सूर्यभान (नानासाहेब) गडाख यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच नूतन कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा होणार असून, अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार अॅड. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज आहिरे, हिरामण खोसकर आणि आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष दौलतराव मोगल, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख, अमित गडाख, तुषार गडाख, प्राचार्य सलीम चौधरी, शिवाजी गाडेकर आदी उपस्थित होते. कर्मवीर सूर्यभान गडाख यांचा पूर्णाकृती पुतळा नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारला आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेला हा पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

नवे शैक्षणिक संकुल, कर्मवीर सूर्यभान गडाख यांचा पूर्णाकृती पुतळा आणि जन्मशताब्दी सोहळ्याची जोड मिळत असल्यामुळे पाथरेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल, ज्येष्ठ संचालक विजय गडाख, सचिव राजेश गडाख, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख, मंडळाचे सर्व संचालक, कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक आणि वारेगाव येथील ग्रामस्थांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्मरणिकेतून कर्मवीरांच्या कार्याचा जागर

कर्मवीर सूर्यभान गडाख यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यामध्ये जन्मापासून पुढील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वाटचालीचा मागोवा घेण्यात आला आहे.

पाथरे : कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलाची नूतन इमारत
Nashik Nampur students drown in Mosam River |नामपुरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू

९०० विद्यार्थ्यांसाठी साडेतीन कोटींचे शैक्षणिक संकुल; शिक्षक - कर्मचाऱ्यांचे ९० लाखांचे योगदान

नूतन शैक्षणिक संकुलाची इमारत सुमारे २६ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची असून, ती दुमजली आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च झाला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुमारे ९० लाख रुपयांचे योगदान देत, या शैक्षणिक उपक्रमाला हातभार लावला आहे. बालवाडीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. सध्या सुमारे ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पाथरे : कर्मवीर सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलाची नूतन इमारत
Nashik |ओझर - शिर्डी मार्ग रुंदीकरणासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सरसावल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news