भारताच्या लष्करी इतिहासातील एक सुवर्णपान आणि शौर्याचे प्रतीक असलेला 'सर्जिकल स्ट्राईक दिन' हा दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. २०१६ मध्ये याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स उद्ध्वस्त केले होते.
१८ सप्टेंबर २०१६ :
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालय कॅम्पवर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या म्याड हल्ल्यात भारताचे १८ वीर जवान शहीद झाले आणि अनेक जवान गंभीर जखमी झाले. भारताच्या प्रत्युत्तरात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
सर्जिकल स्ट्राईक दिन - भारताची भूमिका :
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "उरी हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि हल्लेखोरांना माफ केले जाणार नाही.", असे थेट सुनावले होते.
२९ सप्टेंबर २०१६ : प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईक :
ऑपरेशनची वेळ : २८ व २९ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता ऑपरेशन सुरू आणि पहाटे ४.३० वाजेपर्यंत चालले. यामध्ये ३८ दहशतवादी मारले गेले. भारताच्या एकाही जवानाला दुखापत झाली नाही.
सहभागी दल :
लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या चौथ्या आणि नवव्या पॅरा स्पेशल फोर्सेसचे निवडक कमांडोज.
नियंत्रण रेषा ओलांडली :
भारताचे ७० ते ८० कमांडोज प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात ३ कि.मी. आत प्रत्यक्ष भूमीवर उतरले.
लाँच पॅड्स नष्ट :
भीमबेर, हॉटस्प्रिंग, आणि लीपा या क्षेत्रांमधील एकूण सहा ते सात दहशतवादी लाँच पॅड्स पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
वापरलेली शस्त्रे व यंत्रणा :
भारतीय कमांडोकडे नाईट-व्हिजन रिव्हायसेस, एके-४७ असाॉल्ट रायफल्स, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्स, स्मोक ग्रेनेड्स आणि उच्च स्फोटके होती. सैन्याला कव्हर देण्यासाठी एमआय-१७ हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला.
भारताचे नुकसान :
शून्य (०) : भारताच्या एकाही जवानाला दुखापत किंवा नुकसान झाले नाही.