Udmal Dark Sky | भारतातील पहिले 'डार्क स्काय व्हिलेज' नाशिकमध्ये! सुरगाण्यातील उदमाळ ठरतेय खगोलप्रेमींचे केंद्र

Udmal Dark Sky | उदमाळ ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय डार्क स्काय व्हिलेजविद्यार्थ्यांची खगोलशास्त्राची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी डीपीडीसीचा ४२ लाखांचा निधी
Udmal Dark Sky
Udmal Dark Sky
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा तालुक्यातील उदमाळ गाव हे डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले 'डार्क स्काय समुदाय' गाव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या उपक्रमास आवश्यक निधीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Udmal Dark Sky
Nashik Pune High Speed Rail: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाचा अभ्यास डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीकडे; राज्य शासनाचा निर्णय

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

उदमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. उदमाळ ग्रामसभेने पेसा कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव मंजूर केला आहे.

Udmal Dark Sky
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद अखेर सुटणार! डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

या ठरावाद्वारे प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून ४२.१४ लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या निधीतून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, जबाबदार प्रकाशयोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीमार्फत पर्यटन विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये खगोल पर्यटन (ॲस्ट्रो-टुरिझम) ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. या उपक्रमामुळे उदमाळ व परिसरातील नागरिकांना नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

"राज्य शासनाच्या प्रस्तावित 'राज्य डार्क स्काय धोरणा'शी हा उपक्रम सुसंगत आहे. या उपक्रमातून रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर भूमिका बजावेल, असा विश्वास आहे."

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news