सुरगाणा शहराला जोरदार वादळाचा तडाखा

अनेकांची घरावरील पत्रे उडाले, स्थानिकांचे प्रचंड नुकसान
Nashik News
वादळामुळे स्थानिकांच्या घरांवरील पत्र उडुन गेले आहेत.Pudhari Photo
Published on
Updated on

सुरगाणा : सुरगाणा शहरात मंगळवारी (दि.15) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस जोरदार वादळाचा तडाख्यात पाऊस झाला. या सुटलेल्या वादळामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. तसेच अनेक असून झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक जोरदार वादळ सुटल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. यामध्ये जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या आवारात असलेले वीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड बुध्यांसकट मोडून पडले तर पोलीस ठाण्या जवळील भेंडीचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे. पोलीस स्टेशन इमारतीच्या होमगार्ड खोलीवरील पत्रे जोरदार वादळामुळे हवेत पत्यासारखे उडून पोलीस परेड मैदानावरील पार्किंगच्या दोन गाड्यांवर पडल्याने गाडीच्या काचा फोडून आतमध्ये आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा ठाणगाव येथील शिक्षक प्रविण निकुंभ यांच्या (एमएच १५ जीए ३४९६) या गाडीचे नुकसान झाले आहे.

Nashik News
सांगलीसह जिल्ह्यात जोरदार पाऊस

पोलीस परेड मैदानावर सर्वत्र पत्रे दिसून आले. दवाखाना पाड्यावरील गुरांच्या दवाखाना समोरील घरावरील पत्रे उडाले आहेत. तर बीएसएनएल टॉवर्स जवळील महाले यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. तसेच दुर्गा देवी मंदिरा जवळील निशा पवार गांधीनगर मधील दिनेश मुसळे यांच्या घरावर भेंडीचे झाड पडल्याने घरावरील पत्रे फुटले आहेत.यासह अनेक घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. परतीचा पावसाने भात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून कापणीला आलेला भात भुईसपाट झाला आहे. उंबरठाण, बा-हे, पिंपळसोंड, रघतविहीर, राशा, बेहुडणे, म्हैसखडक या भागात जोरदार पाऊस झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news