Supriya Sule | रडीचा डाव कधी खेळणार माहीत नाही; राज्य सरकारवर टीका

निवडणुका लांबणीवरून खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका
खासदार सुप्रिया सुळे, मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृह
मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन व नवनिर्वाचित खासदारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलतांना खासदार सुप्रिया सुळे.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : महिलांना पंधराशे रुपये देताहेत ही चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या माता- भगिनींच्या संसाराला हातभारच लागतोय. पण पुन्हा सत्तेत येण्यासाठी ते 1500 रुपये वाटत आहे. निवडणुका पुढे ढकलून रडीचा डाव कधी खेळणार हे माहित नाही. त्यांचे दोनच महिने उरलेत. तेव्हा जे मागायचे ते पटापट मागून घ्या. त्यांना फक्त हो म्हणण्याची सवय आहे, पंधराशे देण्याऐवजी शिक्षण आणि आरोग्य मोफत दिले असते तर अधिक चांगले झाले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यावर केली. मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन व नवनिर्वाचित खासदारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

खा. सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, सत्ताधार्‍यांकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली शिक्षणात मनुस्मृतीचा शिरकाव करण्याचा प्रयत्न होत आहे. यास आमचा विरोध आहे. सरकारी नोकर्‍यांचे अलिकडे कंत्राटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुळ संकल्पनेला तडा जातोय. 1500 रुपये देताना धमक्या दिल्या जात आहेत. एकीकडे मदत करायची अन् दुसरीकडे धमकी द्यायची हे योग्य नाही. केंद्राने मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा या मागणीवर त्यांनी आपण मराठीसाठी काय करीत आहात, असा सवाल केला.

खासदार सुप्रिया सुळे, मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृह
Supriya Sule | राज्यात अशांतता पसरविण्याचे षडयंत्र
खासदार सुप्रिया सुळे, मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृह
मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांना राखी बांधतांना खासदार सुप्रिया सुळे. (छाया : हेमंत घोरपडे)

मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरेंनी संस्थेचा लेखाजोखा मांडला. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले यांची भाषणे झाली. याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, खा. शोभा बच्छाव यांनी खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे यांना बीज राखी बांधली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या मविप्रचा विद्यार्थी सर्वेश कुशारे याला एक लाखाची देणगी जाहीर करण्यात आली.

पवित्र पोर्टल बंद करा

मुलांना शाळेत शिकविण्याऐवजी शिक्षकांना पोर्टलचीच कामे अधिक करावी लागतात. मग शिक्षक शिकवणार केव्हा? पोर्टलमुळे शिक्षणसंस्थाही जेरीस आल्या आहेत. तेव्हा पवित्र पोर्टल बंदच करून टाका, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळेंनी केली.

खासदार सुप्रिया सुळे, मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृह
Supriya Sule | लोकसभेतील पराभवामुळे लाडकी बहिण आठवली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news