Sujat Ambedkar | दूषित पाणी, जंगलतोड आणि डेटा सेंटर! सुजात आंबेडकरांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Sujat Ambedkar | सुजात आंबेडकर यांचा 'जेन झी'सोबत संवाद : 'भविष्य' सुरक्षित करण्याचे आवाहन
Sujat Ambedkar
Sujat Ambedkar
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीतमुळे घातक पाणीपुरवठा, भीमाशंकर परिसरात बेसुमार जंगलतोड, दुष्काळात ३२ डेटा सेंटर उभारण्याचे नियोजन आदी प्रश्नांवरून वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. नाशिकमधील औद्योगिक प्रदूषणामुळे आरोग्याला निर्माण झालेला धोका, जंगलतोडीमुळे आदिवासींच्या उपजीविकेवर होणारा परिणाम आणि डेटा सेंटरसाठी होणारा संभाव्य पाण्याचा वापर या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले.

Sujat Ambedkar
Nashik TCS Case : नाशिक 'टीसीएस' प्रकरणी 'एमआयएम' नेते इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

तसेच आपले भविष्य दुसरे कोणी सुरक्षित करणार नाही, त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी 'जेन झी'ला केले. कालिदास कलामंदिर येथे 'जेन झी' कार्यक्रमात आंबेडकर यांनी 'भविष्य' या विषयावर तरुणांशी संवाद साधला. नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील भूजल प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी क्रोमियमयुक्त पाणीच 'जेन झी'ला दाखविले.

पिण्याच्या पाण्यात शंभर नव्हे, तर हजार पटीने क्रोमियमचे प्रमाण असल्याचे सांगत या पाण्यामुळे त्वचारोगाचा सामना करावा लागणाऱ्या तीन महिलांनाच त्यांनी आपबिती विचारली. जवळपास ४ हजार ४०० कुटुंबांना या दूषित पाण्याचा फटका बसला असून, सुमारे २० ते २५ हजार नागरिक प्रभावित झाल्याचे सांगत याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला. भीमाशंकर ते कर्जत परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी जंगलतोडीच्या मुद्यावर बोलताना सुमारे २३३ ते २७७ हेक्टर क्षेत्रातील ३२ ४८ हजार झाडे तोडली जाण्याच शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Sujat Ambedkar
Nashik TCS Case : नाशिक 'टीसीएस' प्रकरणी 'एमआयएम' नेते इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

हा उद्योग गुजरातमधील असून, महाराष्ट्रातीत जंगलतोड कशासाठी, असा प्रश्नह त्यांनी उपस्थित केला. उद्योग समू आणि राजकीय पक्षांना मिळालेल्य 'कथित' आर्थिक देणग्यांचाही त्यांन उल्लेख केला. काँग्रेस, राष्ट्रवाट काँग्रेस आणि शिवसेनेला मिळालेल्य देणग्यांचे आकडे सांगत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, श्रीमंत व्यक्त प्रदूषणापासून बचावासाठी घरात हव् शुद्धीकरण यंत्रे आणि वातानुकूलि यंत्रणा वापरू शकतात; मात्र झोपडपट्ट्यांमध्ये राहणार नागरिकांकडे असे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्न ह सामाजिक न्यायाचाही प्रश्न असल्याच त्यांनी अधोरेखित केले.

३२ डेटा सेंटरला राज्यभर विरोध

राज्यात प्रस्तावित ३२ डेटा सेंटरच्या मुद्द्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. एका डेटा सेंटरला दररोज सुमारे २० लाख लिटर पाणी लागते, असा दावा करत ३२ डेटा सेंटरसाठी दररोज सुमारे सहा कोटी ४० लाख लिटर पाण्याची गरज भासू शकते, असे गणित सुजात आंबेडकर यांनी मांडले. राज्यातील पाणीटंचाई असताना मोठ्या प्रमाणावर पाणी डेटा सेंटरसाठी वापरणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.