Nashik Wani Bandh | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वणीत कडकडीत बंद

व्यापारी, संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Wani Bandh
वणी शहरातील बहुतांश व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या Pudhari
Published on
Updated on

Delhi Students Lathi Charge Maharashtra Bandh

वणी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (दि. २३ ) वणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला वणी व्यापारी असोसिएशनसह व्यापारी, दुकानदार, ऑटोचालक, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिणामी शहरातील बहुतांश व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या.

आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचा आवाज दडपण्याचे कोणतेही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Wani Bandh
Nashik Development Work | 100 टक्के निधी खर्चाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे उद्दिष्ट; ऑगस्टअखेर प्रशासकीय मान्यतेचे आदेश

बंददरम्यान वणी शहरात शांततेचे वातावरण कायम होते. व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच बंदला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व्यापारी, विविध संघटना आणि नागरिकांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news